खंडणीखोर सुकेश चंद्रशेखरच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच

खंडणीखोर सुकेश चंद्रशेखर अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. सुकेशवर 200 कोटींची खंडणी आणि मनी लाँड्रिंगचा आरोप असून तो सध्या तिहार तुरुंगात आहे. या सर्व प्रकरणामुळे सुकेशची बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससोबतची कथित प्रेमकहाणीही चांगलीच चर्चेत आली. दरम्यान, आता खंडणीखोर सुकेशच्या जीवनावरील खरी कथा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. चित्रपट निर्माते आनंद कुमार खंडणीखोर सुकेश चंद्रशेखरच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करणार असल्याचं म्हटलं जात आहे.

याबाबत माहिती देताना तिहार जेलर तुरुंगाचे जेलर एएसपी जेलर दीपक शर्मांनी सांगितलं की, लोकांना सुकेशच्या आयुष्याबाबत जाणून घेण्याची खूप उत्सुकता आहे. आनंद कुमार यांनी सुकेशबद्दल माहिती गोळा करण्यासाठी तुरुंगात भेट दिली होती. दरम्यान, जेलर दीपक यांनी चित्रपट निर्माते आनंद कुमारसोबतचा एक फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केला होता ज्यामुळे आता सुकेशवरील चित्रपटाची चर्चा खरी असल्याचं म्हटलं जात आहे.

‘या’ दिवशी चित्रपट होणार प्रदर्शित

सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपट निर्मात्यांनी 6 महिन्यांसाठी दिल्लीमध्ये एक आलिशान हॉटेल बुक केले आहे. जिथे चित्रपटाचे लेखक राहतील आणि चित्रपटाचे लिखाण करतील. मात्र, याबाबत अद्याप चित्रपटाचे कलाकार आणि ठिकाण सांगण्यात आले नाही. हा चित्रपट 2024 च्या शेवटी किंवा 2025 च्या सुरुवातीला प्रदर्शित होऊ शकतो.

बॉलिवूड अभिनेत्रींना भेट दिली गिफ्ट

सुकेशने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींना महागड्या भेट वस्तू देऊन भूरळ पाडली होती. यात जॅकलीन फर्नांडिस, नोरा फतेही, श्रद्धा कपूर, सारा अली खान, जान्हवी कपूर यांसारख्या अनेकींच्या नावाचा सहभाग आहे. सुकेशने जॅकलीन फर्नांडिसला 52 लाखाचा घोडा आणि 9 लाखांची पर्शियन मांजर देखील भेट दिली होती.


हेही वाचा :

स्टँडअप कॉमेडियन ख्याली सहारनवर बलात्काराचा गुन्हा, 25 वर्षीय तरुणीची तक्रार