घरमनोरंजनयेत्या आठवड्यात 'हे' चित्रपट होणार ओटीटीवर प्रदर्शित

येत्या आठवड्यात ‘हे’ चित्रपट होणार ओटीटीवर प्रदर्शित

Subscribe

मागील काही महिन्यांपूर्वी बॉलिवूडमध्ये बरेच चित्रपट प्रदर्शित झाले होते. मात्र, या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई केली नव्हती. यामध्ये अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपटाचा देखील सहभाग होता. दरम्यान, चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर आता हे चित्रपट ओटीटी वर प्रदर्शित होणार आहेत. येत्या आठवड्यात ओटीटीवर चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होणार आहेत.

या आठवड्यात ओटीटीवर होणार प्रदर्शित

- Advertisement -
  • रक्षाबंधन


अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट या वर्षी 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. मात्र, त्यावेळी सुरू असलेल्या चित्रपटांवरील बहिष्काराच्या मागणीमुळे चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. दरम्यान, आता हा चित्रपट Zee 5 वर 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • मजा मा


बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित ओटीटीवर पदार्पण करत आहे. 6 ऑक्टोबर रोजी ‘मजा मा’ अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होईल. या चित्रपटामध्ये माधुरीसोबतच अभिनेता गजराज राव, रजित कपूर, बरखा सिंह, ऋत्विक भौमिक हे कलाकार महत्वाच्या भूमिका साकारताना दिसतील.

- Advertisement -
  • कार्तिकेय 2


टॉलिवूड अभिनेता ‘कार्तिकेय 2’ या वर्षी 13 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली होती. हा चित्रपट Zee 5 वर 5 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर “चाणक्य”चे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -