घरमनोरंजन'या' आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दिसणार प्रभास-दीपिकाच्या 'प्रोजेक्ट के'ची पहिली झलक

‘या’ आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दिसणार प्रभास-दीपिकाच्या ‘प्रोजेक्ट के’ची पहिली झलक

Subscribe

टॉलिवूड अभिनेता प्रभास सध्या त्याच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटामुळे चर्चेत आहेत. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी कमाई करत आहे. दरम्यान, नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रभासच्या आगामी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाचा फर्स्ट लूक समोर आला होता. ज्यात प्रभाससोबत दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन, अभिनेते कमल हसन आणि बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण देखील मुख्य भूमिकेत असणार आहे.

अशातच, आता या चित्रपटाबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. नुकतीच एक पोस्ट शेअर करत अमिताभ बच्चन यांनी ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटाची पहिली झलक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमामध्ये दाखवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दिसणार ‘प्रोजेक्ट के’ ची पहिली झलक

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

- Advertisement -

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रभास आणि दीपिका, अमिताभ बच्चन यांचा बीग बजेट चित्रपटाची पहिली झलक कॅलिफोर्निया येथील सॅन डिएगो कॉमिक-कॉन इंटरनॅशनल इव्हेंटमध्ये दाखवले जाईल. हा कार्यक्रम 20 जुलैपासून सुरु होणार असून 23 जुलैपर्यंत चालणार आहे. SDCC इव्हेंटची सुरुवात करून, वैजयंती मूव्हीज 19 जुलै रोजी ओपनिंग नाईट पार्टीमध्ये प्रभास-दीपिका आणि अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाची पहिली झलक दाखवेल.

अमिताभ यांनी व्यक्त केला आनंद

- Advertisement -

या चित्रपटाला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाल्याबद्दल बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनी आनंद व्यक्त केला आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलंय की, “हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. हे किती महत्त्वाचे आणि मोठे आहे हे मला कधीच कळले नाही. पण आता मला कळले आहे.”


हेही वाचा :

‘गली बॉय’पासून ‘बाजीराव मस्तानी’पर्यंत ‘हे’ आहेत रणवीर सिंहचे सुपरहिट चित्रपट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -