घरमनोरंजनअभिषेक बच्चनच्या 'घूमर' चित्रपटाचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला

अभिषेक बच्चनच्या ‘घूमर’ चित्रपटाचा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटात अमिताभ बच्चन सुद्धा दिसणार असल्याची बातमी समोर आली होती

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री सैयामी खेर यांची मुख्य भूमिका असलेला ‘घूमर’ चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी या चित्रपटात अमिताभ बच्चन सुद्धा दिसणार असल्याची बातमी समोर आली होती. मात्र आता या चित्रपटाचा पहिला लूक समोर आला आहे. हा दमदार लूक पाहिल्यानंतर चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

पहिला लूक आला समोर

 

View this post on Instagram

 

A post shared by Saiyami Kher (@saiyami)

- Advertisement -

 अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर यांचा ‘घूमर’ चित्रपटातील पहिला लूक समोर आला आहे. शेअर झालेल्या या लूकमध्ये अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री सैयामी खेर एकत्र दिसत आहेत. चाहते या फोटोवर अनेक कमेंट करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री सैयामी खेर घूमर चित्रपटासाठी खूप दिवसांपासून वाट पाहत होते. या चित्रपटाकडून अशी आशा आहे की, हा बॉलिवूडमधील इतर चित्रपटांपेक्षा वेगळा असेल.

चित्रपटात दिसणार अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर
अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री सैयामी खेर यांच्या ‘घूमर’ चित्रपटामध्ये अमिताभ बच्चनसुद्धा दिसणार आहे. गेल्या अनेक वर्षानंतर वडील आणि मुलाची जोडी एकत्र दिसणार आहे. याआधी दोघेही ‘बंटी और बबली’ , ‘सरकार’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसून आले होते.

- Advertisement -

 

 

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -