सलमान खानची दाक्षिणात्य चित्रपटात एन्ट्री, चिरंजीवीसोबत ‘गॉडफादर’चा पहिला लूक रिलीज

या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधे पदार्पण करणार आहे. दाक्षिणात्य चित्रपटात सलमान खानला पाहण्यासाठी त्याचे चाहते सुद्धा उत्सुक आहेत.

दाक्षिणात्य सिने सृष्टीमधील सुपरस्टार चिरंजीवी ‘लुसिफर’ या मल्ल्याळम चित्रपटाचा रिमेक बनविणार आहेत. ‘गॉडफादर'(godfather) असं या रिमेकचं नाव असणार आहे. या चित्रपटात सुपरस्टार चिरंजीवी एका वेगळ्याच अंदाजात दिसणार आहेत. नुकताच या चित्रपटाचा पहिला लुक प्रदर्शित करण्यात आला आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. हा चित्रपट हिंदी प्रमाणेच दाक्षिणात्य प्रेक्षकांसाठी सुद्धा खूप खास असणार आहे. कारण या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडचा भाईजान(bhaijan) म्हणजेच सलमान खान(salman khan) दाक्षिणात्य सिनेसृष्टीमधे पदार्पण करणार आहे.

आणखी वाचा –  समीर-शेफालीचा एकमेकांसाठी भन्नाट उखाणा, सोशल मीडियावर चर्चा

आणखी वाचा –  चित्रपटानंतर अक्षय कुमार राजकरणात? म्हणाला, एक अभिनेता म्हणून…

 

‘गॉडफादर’चा(godfather) पहिला लुक चित्रपटाच्या निर्मात्यांनी शेअर केला आहे. चिरंजीवी यांचा मुलगा दाक्षिणात्य अभिनेता रामचरण याने त्याच्या स्वतःच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून या चित्रपटाचे पहिले पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. राम चरणने(ram charan) ‘गॉडफादर आला आहे’ असे कॅप्शन सुद्धा दिले आहे. या चित्रपटाच्या पोस्टर मध्ये चिरंजीवी हे एका खुर्चीत बसलेले दिसत आहेत. चिरंजीवी(chiranjeevi) यांचा काळा चष्मा लावलेल्या लुकची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. त्याचबरोबर दाक्षिणात्य अभिनेते चिरंजीवी(chiranjeevi) यांचा हा १५३ वा चित्रपट आहे.

आणखी वाचा – Salman Khan: भाईजानचं गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसोबत न्यू इअर सेलिब्रेशन

आणखी वाचा –  सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर

‘गॉडफादर'(godfather) या चित्रपटाचे दिग्दर्शन मोहन राजा करणार आहेत. चिरंजीवी यांच्या चित्रपटात बॉलिवूडचा चुलबुल पांडे म्हणजेच सलमान खान हा छोट्याश्या भूमिकेत दिसणार आहे. याआधीही सलमान खान(salman khan) याने अभिनेता रितेश देशमुख सोबत ‘लय भारी'(lay bhari) या चित्रपटात सुद्धा एक छोटीशी भूमिका साकारली होती. सलमान खानची ती भूमिका सुद्धा खूप चर्चेत आली होती. त्यामुळे दाक्षिणात्य चित्रपटात सलमान खानला पाहण्यासाठी त्याचे चाहते सुद्धा उत्सुक आहेत.

आणखी वाचा – Bigg Boss 15: Salmanला कोणी मोठं झालेलं पहावत नाही, बिचुकलेंना राग…

सलमान खान आणि चिरंजीवी यांच्या सोबत या चित्रपटामध्ये सत्यदेव कंचरण, नयनतारा(nayantara), जय प्रकाश हे कलाकार दिसणार आहेत. त्याच सोबत या चित्रपटात अनुष्का शेट्टी, श्रुती हसन(shruti hasan) आणि राम चरण(ram charan) सुद्धा दिसणार आहेत. या चित्रपटाची सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे.