Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'ब्रह्मास्त्र'मधील नंदी अस्त्रधारी नागार्जुनचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

‘ब्रह्मास्त्र’मधील नंदी अस्त्रधारी नागार्जुनचे पहिले पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

या चित्रपटातील साउथ सुपरस्टार नागार्जुनचा पहिला लूक शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक अधिकच उत्सुक झाले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे नागार्जुन दिर्घ काळानंतर हिंदी चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे

करण जौहरच्या ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी बहुचर्चित चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत. २०१७ मध्ये घोषित झालेल्या या चित्रपटाची ९ सप्टेंबर रोजी रिलीज होणार असून चित्रपटाते दिग्दर्शक याचित्रपटाबाबत एक एक गोष्ट समोर आणत आहेत ज्यामुळे प्रेक्षक अधिकच उत्सुक झाले आहेत. नुकत्याच मागील ३-४ दिवसांपूर्वी अभिनेते अमिताभ यांचे पहिले पोस्टर शेअर करण्यात आले होते. ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती.अशातच आता या चित्रपटातील साउथ सुपरस्टार नागार्जुनचा पहिला लूक शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे प्रेक्षक अधिकच उत्सुक झाले आहेत. याचं मुख्य कारण म्हणजे नागार्जुन दिर्घ काळानंतर हिंदी चित्रपटामध्ये काम करताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Brahmāstra (@brahmastrafilm)

- Advertisement -

इंस्टाग्रामवर नागार्जुनचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टवरून लक्षात येत आहे की चित्रपटात नागार्जुनची जबरदस्त भूमिका पाहायला मिळणार आहे. शिवाय या पोस्टरखाली एक कॅप्शन सुद्धा देण्यात आले आहे. ज्यात लिहिलंय की,
“सहस्र नंदी हैं भुजबल जाके
अंधकार भी थर थर कांपे
हाथों में जिसके है हज़ारों नंदियों का बल. जून १५ रोजी ब्रह्मास्त्र ट्रेलरमध्ये १००० नंदीच्या शक्तिसोबत अनीश आणि त्याच्या नंदी-अस्त्रला भेटा. ॐ शिववाहनाय विद्महे तुण्डाय धीमहि, तन्नो नन्दी: प्रचोदयात”

खरंतर ‘ब्रम्हस्त्र’ चित्रपट एक ट्राइलॉजी आहे म्हणजेच हा ३ भागांमध्ये तयार करण्यात येणारा आहे. या चित्रपटाच्या पहिल्या भागाचे नाव शिवा आहे. म्हणजेच या चित्रपटात रणबीर कपूर शिवा ही भूमिका साकारणार असून नागार्जुन नंदी ही भूमिका साकारणार आहे. तसेच आलिया भट्ट ईशा ही भूमिका साकरणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -