सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर यांच्यासह अजून काही नवीन चेहरे पहायला मिळत आहेत.

शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, श्रीदेवी ची मुलगी खुशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगत्स्य नंदा यांचा पहिला चित्रपट ‘द आर्चीज’चे पहिले पोस्टर सोशल मीडियावर रिलीज झाले आहे. याचं पोस्टर सुहाना खानने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले असून, या पोस्टरमध्ये या तीन सेलिब्रिटी किड्स शिवाय इतर नवे कलाकार सुद्धा दिसत आहेत. घनदाट जंगलामध्ये सहलीला गेल्याचे चित्र या पोस्टरमध्ये दिसत आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

 

View this post on Instagram

 

A post shared by Suhana Khan (@suhanakhan2)

‘द आर्चीज’ चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केलं असून रीमा कागती यांनी या चित्रपटाती निर्मिती केली आहे. अनेक प्रेक्षकांना हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होईल असं वाटत होतं. परंतु सुहानाने खुलासा केला आहे की, हा चित्रपट मोठ्या पडद्यावर रिलीज होणार नसून ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सुहाना खान, अगस्त्य नंदा, खुशी कपूर यांच्यासह अजून काही नवीन चेहरे पहायला मिळत आहेत. असं सांगण्यात येत आहे की ‘द आर्चीज’ या चित्रपटामध्ये अगस्त्य नंदा आर्ची एंड्रयूज, खुशी कपूर बेट्टी कपूर आणि सुहाना खान वेरोनिका लोज या मुख्य भूमिका साकारताना दिसून येतील.

अमिताभ बच्चन यांनी दिल्या शुभेच्छा

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

‘द आर्चीज’चे पोस्टर रिलीज होताच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर ते शेअर करत त्यांच्या नातवाला शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय बॉलिवूड मधील अनेक दिग्गज कमेंट करून संपूर्ण टीमला शुभेच्छा देत आहेत.

 

 


हेही वाचा :केतकी चितळेला शरद पवारांविरोधातील वादग्रस्त वक्तव्य भोवलं