घरमनोरंजनहॉट अॅण्ड बोल्ड सईचा ग्लॅमरस अंदाज!

हॉट अॅण्ड बोल्ड सईचा ग्लॅमरस अंदाज!

Subscribe

पुनीत बलाना, दिशा पाटील आणि ज्युली शाह या तीन डिझाइनर्सच्या रविवारी झालेल्या फॅशन शोजना सईला विशेष आमंत्रण होते. आणि या तीन डिझाइनर्सच्या तीन वेगवेगळ्या शोजना सईचे तीन ग्लॅमरस अंदाज दिसून आले.

फॅशनच्या दुनियेत सध्या सई ताम्हणकर सर्वाधिक लोकप्रिय मराठी अभिनेत्री आहे. लव सोनिया सिनेमामुळे तर आता सई ताम्हणकर ग्लोबली प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे अर्थातच यंदा लॅक्मे फॅशन वीकमध्ये सई ताम्हणकरला एक नाही, दोन नाही तर तीन-तीन डिझाइनर्सकडून आमंत्रण आलं होतं.

पुनीत बलाना, दिशा पाटील आणि ज्युली शाह या तीन डिझाइनर्सच्या रविवारी झालेल्या फॅशन शोजना सईला विशेष आमंत्रण होते. आणि या तीन डिझाइनर्सच्या तीन वेगवेगळ्या शोजना सईचे तीन ग्लॅमरस अंदाज दिसून आले!

- Advertisement -

पुनीत बलानाच्या शोमध्ये सई मोनोक्रोमॅटिक ग्राफिक शॉर्ट ड्रेसमध्ये आली होती. मोनोक्रोमॅटिक ड्रेससोबत पोनीटेल आणि ब्लू आयलाइनरमुळे तिचा एलिगन्ट लुक दिसून येत होता. सईच्या या बोहो-चीक लुकमूळे ती फॅशन शोला आलेल्या प्रत्येकाचेच लक्ष वेधून घेत होती.

- Advertisement -

पुनीत बलानानंतर सईने दिशा पाटीलचाही फॅशन शो अटेंड केला. या शोला सई थ्री पीस लुक मध्ये दिसली. ज्यामध्ये सईने लव्हेंडर कलरचा क्रॉप टॉप, पलाझो पँट्स आणि एम्ब्रॉयडरी केलेलं जॅकेट घातलं होतं. सईच्या या लुकला खूप प्रशंसा मिळाली. अशावेळी पॅपाराझी झाली नसती तरच नवलं. लॅक्मे फॅशन शोच्या रेडकार्पेटवर सईचा हा लुक हिट असल्याचं फॅशन फोटोग्राफर्सच्या न थांबणा-या क्लिक-क्लिकने दिसून आलं.

जुली शाहच्या ‘अबजीनी’ कलेक्शन असलेल्या फॅशन शोला येताना सईने पेस्टल पींक कलरचा धोतीकट जम्पसूट घातला होता. न्यूड लिपस्टिक, न्यूड हिल्स आणि फक्त गोल्डन बँगल्समूळे या लुकला एक वेगळंच ग्लॅमर आलं. सईच्या या स्टनिंग इव्हिनिंग लुकमुळे ती फॅशन ब्लॉगर्सच्या आकर्षणाचे केंद्र बनली.

लवकरच सई ‘लव्ह सोनिया’ या हिंदी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. देहविक्री या विषयावर आधारीत हा चित्रपट आहे. तबरेझ नुरानी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -