Tuesday, May 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन ''पॉलिटिकल क्लासचे हात रक्ताने रंगलेत'', पूजा भट्टची केंद्र सरकारवर टिका

”पॉलिटिकल क्लासचे हात रक्ताने रंगलेत”, पूजा भट्टची केंद्र सरकारवर टिका

पूजा भट्टनेही वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करताना केंद्र सरकारच्या यंत्रणेवर जोरदार टीका केली आहे. तिचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट ही सोशल मीडियावर बरीच सक्रीय असते. सोशल मीडियाद्वारे बिनधास्तपणे आपले मत ती नेहमी मांडत असते. पूजाने ट्विटरवर केलेल्या एका ट्विटमुळे आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूजा नेहमीच राजकीय आणि सामाजिक मुद्द्यावर आपलं मत मांडत असते. आताही पूजाने देशातील कोरोनाची स्थिती आणि राजकारण या दोनही मुद्द्यांवर आपले बेधडक मत मांडले आहे. देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहेत. अशातच हॉस्पिटल्समध्ये बेड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. या कारणानने राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पूजा भट्टनेही वाढत्या कोरोना रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त करताना केंद्र सरकारच्या यंत्रणेवर जोरदार टीका केली आहे. तिचं हे ट्वीट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja B (@poojab1972)

 ”कोणाला कोरोनाशी लढत असलेल्या या लोकांसाठी वाईट वाटत आहे का? कारण मला नक्कीच वाटत आहे. ज्या प्रत्येक मृत्यूबद्दल मी ऐकते. त्या त्या वेळी मला धक्का बसत आहे. ही यंत्रणा पूर्णपणे हारलेली आहे.” अशा प्रकारचे ट्विट शेअर करत पूजाने राज्य आणि केंद्र सरकारच्या यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच ”पॉलिटिकल क्लासचे हात रक्ताने रंगले आहेत. कारण त्यांनी याची पूर्वतयारीच केली नाही. त्यांनी नेहमीच सर्व काही ठीक आहे असा चुकीचा संदेश लोकांना दिला. त्यांनी आम्हाला सर्वांना आमच्या जबाबदारीवर सोडून दिलेलं आहे.” असेही बेधडकपणे पूजा या ट्विटमध्ये म्हणाली आहे.

- Advertisement -

 पूजासोबत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही याविषयी आपली मते बिनधास्तपणे मांडत मोदी सरकारवर टिका केली आहे. दरम्यान कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजला आहे. सामान्य जनतेसहीत मनोरंजन क्षेत्रालाही याचा जोरदार फटका बसला आहे. दररोज लाखो रुग्णांची भर पडत आहे. संपूर्ण जग यामुळे त्रस्त झाले आहे. जगातील अनेक देशांनी यासाठी वेगवेगळ्या लशी विकसित केल्या आहेत.


हे वाचा- अजयचा ओटीटीवर धूमाकूळ, ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisement -