घरमनोरंजनरंगभूमीवरचा आनंदी चेहरा हरपला; प्रदीप पटवर्धनांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

रंगभूमीवरचा आनंदी चेहरा हरपला; प्रदीप पटवर्धनांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Subscribe

रंगभूमीवरचा हसरा आणि सदाबहार चेहरा यापुढे दिसणार नाही, याचे अतिशय वाईट वाटते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत'.

चित्रपट सृष्टीमधील एक सदाबहार चेहरा म्हणजेच ज्येष्ठ मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन(pradeep patwardhan) यांचं आज निधन झालं. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपट सृष्टीवरच शोककळा पसरली आहे. चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांनी प्रदीप पटवर्धन यांचं निधन झाल्याने शोक व्यक्त केला. त्याचबरोबर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहे. राज्यचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(eknath shinde), राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे(supriya sule) यांनी सुद्धा प्रदीप पटवर्धन यांचं निधन झाल्याने शोक व्यक्त अकेला आहे. ‘प्रदीप पटवर्धन यांची अकाली ‘एक्झिट’ मनाला चटका लावणारी आहे. रंगभूमीवरचा हसरा आणि सदाबहार चेहरा यापुढे दिसणार नाही, याचे अतिशय वाईट वाटते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत’.

हे ही वाचा – ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन; वयाच्या 65व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

- Advertisement -

‘जेव्हा फक्त दूरदर्शनचा( door darshan) जमाना होता, त्या मनोरंजनाच्या प्रारंभीच्या काळात अनेक मालिकांच्या माध्यमांतून घराघरात ते पोहोचले आणि नंतर अनेक नाटकांच्या माध्यमातून त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात आपली स्वत:ची अमिट अशी छाप उमटवली. ‘मोरुची मावशी’ या नाटकाचे स्मरण होताना प्रत्येक वेळी प्रदीप पटवर्धन यांची आठवण होईल. अनेक चित्रपट सुद्धा त्यांनी गाजवले. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे कुटुंबीय, आप्तेष्ट आणि चाहते यांच्या दु:खात मी सहभागी आहे’ असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदीप पटवर्धन यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करतं म्हटले आहे.

हे ही वाचा – हसरा-खेळता अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला… सुप्रिया सुळेंकडून प्रदीप पटवर्धनांच्या निधनावर शोक व्यक्त

- Advertisement -

प्रदीप पटवर्धन यांनी आत्तापर्यंत नवरा माझा नवसाचा, चश्मे बहाद्दर, एक दोन तीन चार, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमलं हो जमलं, एक शोध अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केले. गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट, व टू थ्री फोर, जर्नी प्रेमाची, परिस, थँक यू विठ्ठलामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची चुनूक दाखवली. प्रदीप पटवर्धन यांनी वयाच्या ६५ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

हे ही वाचा –  अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनपटात पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -