हेमांगी विचारतेय ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’ नेटकऱ्यांकडून मिळालं सनसनीत उत्तर

"बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनाच बाई" असं एका युजरने म्हटले आहे. तर दुसरा एकजण म्हणाला की, "अशा कॉमेंट वरुन केतकी चितळे व्हाल"

सध्या संपूर्ण भारताचे लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींकडे लागून राहिलेले आहे. शिवसेना नेचे एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मागील तीन दिवसांमध्ये महाविकास आघाडी सरकार कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. दरम्यान या परिस्थितीबाबत राजकीय क्षेत्रासोबतच सिनेसृष्टीतील कलाकारही आपलं मत व्यक्त करत आहेत. त्यात सुमित राघवन, किरण माने, हेमंत ढोमे यांच्यासारख्या बऱ्याच कलाकारांनी आपले मत व्यक्त केले.

अशातच यासंदर्भात आता मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने सुद्धा सोशल मीडियाद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. हेमांगी कवीने याआधी सुद्धा अनेकदा राजकीय घडामोंडींवरून आपले मत व्यक्त केलेले आहे. या वेळी सुद्धा हेमांगी कवीने आपले मत व्यक्त केले आहे. त्यात तिने म्हटलंय की, ‘आता कुणाला खरा वाघ म्हणायचं?’, असं हेमांगीने लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

 मात्र तिच्या या पोस्टवरून युजर्स तिला ट्रोल देखील करत आहेत. “बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनाच बाई” असं एका युजरने म्हटले आहे. तर दुसरा एकजण म्हणाला की, “अशा कॉमेंट वरुन केतकी चितळे व्हाल”, अजून एकजण म्हणाला, “सावधान खरा वाघ गेलाय शिकाऱ्या बरोबर तेही ४० वाघांना घेऊन” अश्या अनेक कमेंट्स युजर्स करत आहेत.

तसेच हेमांगी कवीने या पोस्टनंतर तिच्या ‘तमाशा Live’ चित्रपटातील ‘हाच खरा हाय वाघ!’ हे गाणं शेअर केले आहे. ‘तमाशा Live’ १५ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.


हेही वाचा :उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकून बिग बॉस फेम शिव ठाकरेची आई झाली भावूक