बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या ‘OMG 2’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 11 ऑगस्ट रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षक या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद देताना दिसत आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी या चित्रपटाने 10 कोटी कमावले होते तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 15 कोटी कमावले. मात्र अशातच, दुसरीकडे या चित्रपटातील काही सीन्समुळे चित्रपट वादाच्या कचाट्यात सापडला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, या चित्रपटामध्ये शाळांमधील लैंगिक शिक्षण हा विषय मांडण्यात आला आहे. या चित्रपटातील काही सीन्समुळे चित्रपट वादाच्या कचाट्यात सापडला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय हिंदू परिषदेने या चित्रपटा शिव दूताची भूमिका साकारणाऱ्या अक्षय कुमारवर थुंकणाऱ्या व्यक्तीला 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.
अक्षय कुमारच्या पुतळ्याचे दहन
हिंदू संघटनेचे अध्यक्ष गोविंद पाराशर यांनी या 10 लाखांच्या बक्षीसाची घोषणा केली. शिवाय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आग्रा येथे अक्षय कुमारचा पुतळा आणि चित्रपटाचे पुतळे जाळले. या हिंदू संघटनेच्या मते, अक्षयने या चित्रपटामध्ये महादेवाच्या दूताची भूमिका साकारली आहे मात्र, तो यामध्ये घाण पाण्यात अंघोळ करतो कचोरी खरेदी करतो आणि यामध्ये तो बूट देखील घालतो यांसारख्या अनेक सीन्समुळे अनेकांच्या धार्मिक भावना दुखावल्याच म्हटलं जात आहे.
‘OMG 2’ वर बंदी घालण्याची मागणी
हिंदू संघटनेने अक्षयच्या ‘OMG 2’ वर बंदी घालण्याची मागणी केली असून बंदी झाल्यास चित्रपटाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा केला आहे. दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी देखील वादाच्या कचाट्यात सापडला होता. या चित्रपटाचे जेव्हा पोस्टर रिलीज करण्यात आले होते तेव्हा सेन्सॉर बोर्डाने अनेक बदल, नियम,अटी सांगत या चित्रपटाला A प्रमाणपत्र दिले होते.
‘OMG 2’साठी अक्षयने मानधन केले कमी
सुपरस्टार अक्षय कुमार बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेण्याऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. पूर्वी अक्षय त्याच्या चित्रपटासाठी जवळपास 50-100 कोटीपर्यंत मानधन घ्यायचा परंतु मागील वर्षी सर्व चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर अक्षयने त्याचे मानधन कमी केले आहे. येत्या ‘ओह माय गॉड 2’ साठी अक्षयने जवळपास 35 कोटी रुपये चार्ज केले आहेत. तर पंकज त्रिपाठी यांनी 5 कोटी चार्ज केले आहेत. तर यामी गौतमने 2-3 कोटी चार्ज केले आहेत. अक्षयने केवळ या चित्रपटासाठीच नाही तर ‘छोटे मियां बड़े मियां’ या चित्रपटासाठी त्याचे मानधन कमी केले आहे.