अकबरबद्दल सांगितला जाणार इतिहास चुकीचा… नसिरुद्दीन शाहांचं वक्तव्य

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह सध्या त्यांच्या ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’या वेब सीरिजमुळे चर्चेत आहेत. या वेब सीरिजमध्ये त्यांनी मुघल सम्राट अकबरची भूमिका साकारली आहे. याचं निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्यांनी इतिहासात अकबराबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा दावा केला आहे.

एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी अकबराबाबत सांगितले की, “इतिहासात अकबर नवीन धर्म सुरु करणार असं म्हटलं जात होतं, त्यामुळे याबाबत मी काही इतिहासकारांना याबाबत विचारले, त्यांनी सांगितले की, अकबराने कधीही कोणाताही नवीन धर्म सुरु करण्याचा प्रयत्न केला नाही. ही एक वस्तुस्थिती आहे, जी आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये आहे ज्याला दिन-ए-इलाही म्हणतात. पण अकबरने कधीही दिन-ए इलाही हा शब्द वापरला नाही. त्याने त्याला वाहदत-ए इलाही म्हटलं, ज्याचा अर्थ सर्वांची निर्मिती करणारा एकच होता असा होतो.”

या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांनी सांगितले की, “मुघल सम्राट अकबर दयाळू, व्यापक विचारसरणी असलेल्या प्रगतीशील सम्राट होता. तो खूप रागीट, लैंगिकदृष्ट्या प्रेरित, क्रूर व निर्दयी योद्धा होता शिवाय तो एक महान प्रेमीही होता. त्याच्या शेकडो पत्नी होत्या.”

दरम्यान, याआधी देखील नसीरुद्दीन शाह यांनी अकबर आणि मुघल साम्राज्याबद्दल भाष्य केले होते. त्यावेळी त्यांनी मुघल इतकेच वाईट होते, तर त्यांनी निर्माण केलेला लाल किल्ला आणि ताज महाल पाडा असं म्हटलं होतं.


हेही वाचा :

ऑस्कर 2023 मध्ये ‘नाटू नाटू’गाण्याचा होणार लाइव्ह परफॉर्मन्स