Friday, June 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन चक्क शोकसभे दरम्यान करण जोहरला सुचली 'या' वेब शो ची कल्पना !

चक्क शोकसभे दरम्यान करण जोहरला सुचली ‘या’ वेब शो ची कल्पना !

आम्ही दिल्लीमध्ये एका शोकसभेसाठी  जात होतो. माझ्या मित्राच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यावेळेस माला या वेब शो ची कल्पना सुचली. या चारही बायका खूप पागल आहेत मी त्यांना खूप पूर्वी  पासून ओळखतो

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड फिल्ममेकर करण जोहरचा नेटफ्लिक्सवर काही दिवसांपूर्वी  ‘फॅब्यूलस लाइव्स ऑफ बॉलिवूड वाइव्स’ हा  वेब शो रिलीज झाला होता यामध्ये महीप कपूर (संजय कपूरची पत्नी), सीमा खान (सोहेल खानची पत्नी), भावना पांडे (चंकी पांडेची पत्नी)आणि अभिनेत्री नीलम कपूर झळकल्या होत्या. हा शो खुपच रंगला होता. शो दरम्यान चारही बॉलिवूड मधील बायकांच्या आयुष्यातील काही घडामोडी दाखवण्यात आल्या होत्या. नुकतच करण जोहारने खुलासा केला आहे की त्याला या मालिकेची कल्पना कशी सुचली.बॉलिवूड वाइव्सच्या रियुनियनमध्ये करणने संगितले आहे की चारही महिला माझ्यासाठी खूप खास आहेत. आम्ही गेल्या दीड दशकापासून सोबत आहोत. पण मी हे सांगू इच्छितो की,या मालिकेची कल्पना माला एका फ्लाइट दरम्यान सुचली. आम्ही दिल्लीमध्ये एका शोकसभेसाठी  जात होतो. माझ्या मित्राच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्यावेळेस माला या वेब शो ची कल्पना सुचली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)


या चारही बायका खूप पागल आहेत मी त्यांना खूप पूर्वी  पासून ओळखतो. आम्ही एका पेहरावाबद्दल चर्चा करत होतो. मधुर भांडारकरच्या पेज 3 प्रमाणे.  यावेळेस निलमने एका पांढर्‍या रंगाचा खूप चमकणारा कुर्ता परिधान केला होता आणि याच दरम्यान महीपने शोक सभेनुसारच कपडे घातले होते. हे खूप मजेशीर आणि मूर्खतापूर्ण होतं. त्यावेळेसच माला या वेब शो ची कल्पना सुचली आम्ही पूर्ण फ्लाइट दरम्यान वायफळ बडबड करत होतो


- Advertisement -

हे हि वाचा – परिणीति चोपडाने इंटीमेट सीनबद्दल दिले स्पष्टीकरण,म्हणाली ‘सीन कट म्हणजे कट’

- Advertisement -