Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मनोरंजन 'तूफ़ान' सिनेमाच्या प्रेरणादायी टाइटल ट्रॅकला प्रेक्षकांनी दिला भरघोस प्रतिसाद

‘तूफ़ान’ सिनेमाच्या प्रेरणादायी टाइटल ट्रॅकला प्रेक्षकांनी दिला भरघोस प्रतिसाद

सिनेमाच्या नवाप्रमानेच टायटल ट्रॅक देखील तितक्याच तूफान जोशात हिट होत आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरचा(Farhan Akhtar) बहुचर्चित “तुफान” सिनेमाचा बोलबाला सध्या बॉलिवूडमध्ये रंगत आहे. काही दिवसांपुर्वी सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. चाहत्यांनी ट्रेलरला प्रचंड प्रतिसाद दिल्यानंतर तुफान सिनेमातील टायटल ट्रॅक सुपरहिट साँग सुद्धा रिलीज करण्यात आलं आहे. बहुप्रतिभाशाली सिद्धार्थ महादेवन यांच्या आवाजातील सिमेमाचा टाइटल ट्रॅक जावेद अख्तर यांनी लिहलं असून,शंकर एहसान लॉय यांनी स्वरबद्ध केला आहे. सिनेमाच्या नवाप्रमानेच टायटल ट्रॅक देखील तितक्याच तूफान जोशात हिट होत आहे.‘तुफान’ सिनेमात फरहान अख्तर हा बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. यामुळे फरहानने या भूमिकेला योग्य न्याय देण्यासाठी अधिक मेहनत घेतली आहे.मुंबईतील डोंगरी भागातील एका मुलाच्या आयुष्यावरील बेतलेला हा चित्रपट आहे. तो अंडरवर्ल्डच्या काळ्या जगापासून स्वत:ला वेगळे ठेवत, एक ध्येय ठरवून स्वत:ची एक छबी तयार करतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

- Advertisement -

रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि राकेश ओमप्रकाश मेहरा निर्मित तुफान सिनेमात प्रेरणादायक स्पोर्ट्स ड्रामा उलगडणार आहे. या सिनेमात दिग्गज कलाकार सहभागी असून मुख्य भूमिकेत फरहान अख्तर असणार आहे. त्याच्यासोबत मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसेन दलाल, डॉ. मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राझ झळकणार आहेत. राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे. 16 जुलै रोजी सिनेमा अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे.हे हि वाचा – ‘मीमी’ सिनेमात महिला प्रधान भूमिकेत दिसणार कृति सेनन- Advertisement -

 

- Advertisement -