Sunday, June 4, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन अक्षय कुमारने 'बेवफा' म्हणत कपिल शर्माला मारली मिठी, जुन्या भांडणानंतर दोघे पुन्हा...

अक्षय कुमारने ‘बेवफा’ म्हणत कपिल शर्माला मारली मिठी, जुन्या भांडणानंतर दोघे पुन्हा एकत्र

Subscribe

दोघांनी त्यांचा वाद मिटवला असून ते पुन्हा एकत्र आले आहेत, यासंबंधीत माहिती कपील शर्माने त्याच्या सोशल मिडिया अकांउंटवर दिली आहे.

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार आणि कॉमेडीयन कपिल शर्मा यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी काहीतरी खटकल्याचं बोललं जात होतं. गेल्या महिन्यात या दोघांचं भांडण झालं असल्याची बातमी समोर आली होती. पण आता खूप दिवसानंतर त्यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. दोघांनी त्यांचा वाद मिटवला असून ते पुन्हा एकत्र आले आहेत, यासंबंधीत माहिती कपील शर्माने त्याच्या सोशल मिडिया अकांउंटवर दिली आहे. त्यावेळी तो म्हणाला की, माझ्यामध्ये आणि अक्षय कुमारमध्ये कोणाताचं वाद नाही.अक्षय कुमार पुन्हा एकदा कपिल शर्मा शोमध्ये परत येणार आहे. त्यांच्या ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारने पुन्हा एकदा कपिल शर्मा शोला भेट दिली आहे.

‘द कपिल शर्मा शो’च्या येत्या एपिसोडमध्ये अक्षय कमार , कृति सेनन , जैकलीन फर्नांडिस आणि अरशद वारसी हे  कलाकार दिसून येतील. यासंबंधीत विडिओ आणि फोटो सोशल मिडियावर वायरल होत आहेत. यामध्ये अक्षय कुमार आणि कपिल शर्मा एकमेकांना इशाऱ्यांमध्ये बेवफा म्हणताना दिसून येतील. खरंतर हे दोघेजण एका कॉमेडी व्हिडिओद्वारे त्याचं ‘सारे बोलो बेवफा’ या नव्या गाण्याला प्रमोट करताना दिसून येत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

- Advertisement -

दरम्यान काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार आणि कपिल शर्मा यांमध्ये भांडण झाल्याची बातमी समोर आली होती. खरंतर झालं असं होतं की, अक्षय त्याचा याआधीचा चित्रपट ‘अतरंगी रे’च्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये आला होता.त्यावेळी कपिलने अक्षयने पंतप्रधानानांवर दिलेल्या इंटरव्यूची खिल्ली उडवली होती. शोमध्ये कपिलने अक्षयची उडवलेली खिल्ली अक्षयला अजिबात आवडली नव्हती.


- Advertisement -

हेही वाचा –  सपना चौधरीचा सोशल मीडियाला राम-राम, चाहते पडले चिंतेत

- Advertisment -