Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Video: पाहा कपिल शर्मा आणि कृष्णाने कॉन्ट्रोवर्सीवरून कंगनाची उडवली खिल्ली

Video: पाहा कपिल शर्मा आणि कृष्णाने कॉन्ट्रोवर्सीवरून कंगनाची उडवली खिल्ली

Related Story

- Advertisement -

‘द कपिल शर्मा शो’मध्ये पुन्हा एकदा अभिनेत्री कंगना रनौत दिसणार आहे. आगामी चित्रपट ‘थलायवी’च्या प्रमोशनमध्ये सध्या ती व्यस्त आहे. पण सध्या सोशल मीडियावर कपिल शर्मा शोमधली एक छोटीशी क्लिप व्हायरल होत आहे. यामध्ये कंगना कपिल शर्मा शोमध्ये साउथ इंडिया स्टाईलमध्ये साडी आणि मेकअप करून आल्याचे दिसत आहे. यादरम्यान कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेक कंगनाच्या कॉन्ट्रोवर्सीवरून खिल्ली उडवताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये पाहू शकता की, सुरुवातीला जेव्हा कंगना एंट्री करते तेव्हा कपिल शर्मा मजाकमध्ये कंगना विचारतो की, ‘तुझ्या येण्यापूर्वीसेटवर खूप जास्त सिक्युरिटी येऊन गेली. याचे कारण काय आहे? आम्ही खूप घाबरलो होतो, आम्ही असे काय बोललो? एवढी सारी सिक्युरिटी ठेवण्यासाठी काय करावे लागते?’ यावर कंगनाने उत्तर दिले की, ‘फक्त खरे बोलावे लागते.’ त्यानंतर पुन्हा कपिल कंगनाला विचारतो की, ‘इतके दिवस कॉन्ट्रोवर्सीमध्ये नाही आहे, कसे वाटतेय?’ कपिलच्या या प्रश्नावर दोघेही हसू लागतात.

- Advertisement -

त्यानंतर व्हिडिओच्या शेवटी कृष्णा अभिषेक कपिल शर्माची तक्रार कंगनाकडे करत म्हणतो की, ‘मॅम, या माणसाने माझे पार्लर तोडले. जेव्हा आपली वस्तू तुटते तेव्हा मनाला काय वाटते हे तुम्हाला खूप चांगले माहित आहे.’ हे ऐकूण कंगना पुन्हा एकदा हसू लागते. सध्या ‘द कपिल शर्मा शो’मधील हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Raavan Leela Trailer: प्रतिक गांधी ‘रावण लीला’मध्ये दिसणार रोमँटिक अंदाजात; पाहा ट्रेलर


- Advertisement -