The Kashmir Files Day 9 Collection : 9व्या दिवशी ‘द काश्मीर फाईल्स’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्सने रिलीजच्या आठव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १९.१५ करोड रुपयांची कमाई केली. तर शनिवारी हे कलेक्शन पहिल्यांदा २० करोडचा आकडा पार केला.

The Kashmir Files Day 9 Collection and bachchan pandey day 2 box office collection
The Kashmir Files Day 9 Collection : 9व्या दिवशी 'द काश्मीर फाईल्स' बॉक्स ऑफिसवर यशस्वी

द काश्मीर या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सलग नवव्या दिवशी सिनेमा बॉक्स ऑसिफवर चांगली कमाई करत यशस्वी झाला आहे.  द काश्मीर फाईल्सने रिलीजच्या नवव्या दिवशी २६.५ करोड रुपयांची कमाई केली. असे असले तरी नऊ दिवसात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये अजूनही बाहुबली २ हा सिनेमा टॉपवर आहे. परंतु द काश्मीर फाईल्सला प्रेक्षकांचा असाच प्रतिसाद मिळत राहिला तर सिनेमा रेकॉर्ड ब्रेक कमाई करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

सिने विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्सने रिलीजच्या आठव्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी १९.१५ करोड रुपयांची कमाई केली. तर शनिवारी हे कलेक्शन पहिल्यांदा २० करोडचा आकडा पार केला. तर दुसरीकडे खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षीत बच्चन पांडे सिनेमाच्या कमाईत घसरण पहायला मिळाली. बच्चन पांडे सिनेमाने पहिल्याच दिवशी केवळ १३.२५ करोडची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी १२ करोड रुपये कमावण्यात सिनेमा यशस्वी झालाय. द काश्मीर फाईल्स या सिनेमामुळे बॉलिवूडमध्ये सध्या रिलीज होणारे सिनेमे फ्लॉप होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

The Kashmir Filesच्या वादावर नाना पाटेकर म्हणाले, ‘समाजात फूट पाडणे ठीक नाही’

 ‘The Kashmir Files’ दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींना ‘Y’ कॅटेगरी सिक्युरिटी

द काश्मीर फाईल्सच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. सिनेमा लवकरच १०० करोडचा आकडा पार करेन अशी अपेक्षा आहे. तसेच दुसऱ्या आठवड्यात सिनेमा दाक्षिणात्य भाषांमध्ये डब करुन रिलीज झाला तर सिनेमा आणखी कमाई करु शकतो. ट्रेंड विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार, द काश्मीर फाईल्स हा सिनेमा तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर ३०० करोडची कमाई करू शकतो. कारण अनेक राज्यांमध्ये सिनेमाचे अँडवान्स बुकींग सुरू झाले आहे.


हेही वाचा –  ‘The Kashmir Files’ टॅक्स फ्री झाल्यावर ‘Jhund’ निर्मातीने केला सवाल

Photo:’द काश्मीर फाईल्स’ आधी टॅक्स फ्री झालेत ‘हे’ बॉलिवूड सिनेमे