घरताज्या घडामोडीThe Kashmir Files : गोव्यासह 'या' राज्यांमध्ये 'द काश्मीर फाईल्स' टॅक्स...

The Kashmir Files : गोव्यासह ‘या’ राज्यांमध्ये ‘द काश्मीर फाईल्स’ टॅक्स फ्री

Subscribe

१९९०मध्ये जम्मू काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या जिवनावर आधारित सिनेमा प्रमोद सावंत यांनी पाहिल्यानंतर त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मीर फाईल्स हा सिनेमा ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला आहे. सिनेमा रिलीज झाल्यापासूनच सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगले कलेक्शन केले आहे. सिनेमाची कथा प्रेक्षकांच्या मनाला भावली असल्याची प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिली आहे. काश्मीर फाईल्स हा सिनेमात गोव्यात टॅक्स फ्री म्हणून घोषित करण्यात आला आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते प्रमोद सावंत यांनी ही घोषणा केली आहे. १९९०मध्ये जम्मू काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या जिवनावर आधारित सिनेमा प्रमोद सावंत यांनी पाहिल्यानंतर त्यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

गोव्यासह देशातील अनेक जिल्ह्यांनी द काश्मीर फाईल्स सिनेमा टॅक्स फ्रि असल्याचे घोषित केले आहे. पहिल्यांदा कर्नाटक, हरियाणा, गुजरात आणि मध्यप्रदेश सरकारने सिनेमावरील टॅक्स रद्द केला.

- Advertisement -

पंतप्रधान मोदींनाही भावला ‘The Kashmir Files’ सिनेमा

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी ट्विट करत माहिती दिली ते म्हणाले, विवेक अग्नीहोत्री यांनी सिनेमात भयानक आणि मार्मिक दृश्य दाखवली आहे त्यामुळे सिनेमा खरंच कौतुकास्पद आहे. काश्मीरी पंडितांना कशाप्रकारे घरातून काढून टाकले हे अचूक दाखवले आहे. मी या सिनेमाला नक्कीच सपोर्ट करेल आणि इतक लोकांनीही सिनेमा पाहावा यासाठी कर्नाटकमध्ये सिनेमा टॅक्स फ्री करत असल्याचे त्यांनी सांगितले.

द काश्मीर फाईल्स सिनेमात अभिनेते अनुपम खेर, आणि मिथुन चक्रवर्ती सारखे दिग्गज कलाकार आहेत. त्याचप्रमाणे अभिनेत्री पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर, पुनीत इस्सर, भाशा संम्बली हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहेत.

The Kashmir Files वरून काँग्रेसने ट्विट करत BJPवर साधला निशाणा

देशात भाजपद्वारे अनेक राज्यात द काश्मीर फाईल्स सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातही सिनेमा टॅक्स फ्री घोषित करावा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्रात सिनेमा टॅक्स फ्री करण्याबाबत अद्याप तरी विचार झालेला नाही.


हेही वाचा  –  The Kashmir File : विवेक अग्निहोत्रीला ‘ द कश्मीर फाईल’ सिनेमा बनवण्यासाठी लागले 4 वर्ष, फतवाही काढला होता

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -