‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या कोटामध्ये 21 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू

२२ मार्च म्हणजेच आज पासून सकाळी ६ वाजल्यापासून २१ एप्रिलला दुपारी १२ वाजेपर्यंत कोटा येथे कलम १४४ लागू असेल.

the kashmir files screening section 144 enforced in rajasthan kota
'द काश्मीर फाइल्स' चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानच्या कोटामध्ये 21 एप्रिलपर्यंत कलम 144 लागू

द काश्मीर फाईल्स ( the kashmir files)  हा सिनेमा सध्या देशभरात गाजतोय. अनेक राज्यांनी सिनेमा टॅक्स फ्री घोषित केलाय. सिनेमावरुन अनेक वाद विवाद सध्या पाहायला मिळात आहेत. दरम्यान राजस्थानच्या कोटामध्ये द काश्मीर फाईल्स सिनेमाच्या स्क्रिनिंगमुळे कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ( the kashmir files screening section 144 enforced in rajasthan kota)  राजस्थानच्या कोटामध्ये मंगळवारी 22 मार्च ते 21 एप्रिल या कालावधीत कलम 144 लागू करण्यात आला आहे. येत्या काळात कोटामध्ये अनेक सण साजरे होणार आहे. या काळात द काश्मीर फाईल्स या सिनेमाच्या स्क्रीनिंगमुळे कायदा सुव्यस्था राखण्यासाठी राजस्थानच्या कोटामध्ये कलम 144 लागू करण्यात आला आहे. 22 मार्च म्हणजेच आज पासून सकाळी 6 वाजल्यापासून 21 एप्रिलला दुपारी 12 वाजेपर्यंत कोटा येथे कलम 144 लागू असेल.

कोटामध्ये कलम 144 लागू असताना सभा, विरोधी प्रदर्शने आणि मोर्चांवर निर्बंध असतील तर सरकारी कार्यक्रम, कोरोना विरोधी लसीकरणावर कोणतेही निर्बंध लागू नसतील.

आदेशात म्हटले गेले आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून अनावश्यक आणि त्रासदायक पोस्ट करणे आणि त्या व्हायरल करण्यास मनाई आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात आयपीसी कलम 188 अंतर्गत कारवाई केली जाईल.

सोमवारी जारी केलेल्या आदेशाविरोधात सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. राईट टू जस्टिस वरचा सिनेमा लोकशाही राज्यात आडवा येत असेल तर आम्ही न्यायाचा काय विचार करावा ? असे प्रश्न विवेक अग्निहोत्री यांनी मंत्री अनुराग ठाकूर यांना केला आहे.

विवेक अग्निहोत्री यांनी मुख्यमंत्र्यांना टॅग करत म्हटलेय, दहशतवाद्यांकडे एकच ताकद आहे ती म्हणजे ते भिती निर्माण करतात आणि आम्ही घाबरतो. तर पुढे त्यांनी प्रेक्षकांना उद्देशून म्हटलेय, तुम्हाला आता न्याय देण्याची वेळ आली आहे.


हेही वाचा – The Kashmir Files Day 9 Collection : 9व्या दिवशी ‘द काश्मीर फाईल्स’ बॉक्स ऑफिसवर यशस्वी