घरमनोरंजन‘द केरळ स्टोरी’ने अवघ्या तीन दिवसांत कमावले 'इतके' कोटी

‘द केरळ स्टोरी’ने अवघ्या तीन दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

Subscribe

बहुचर्चित ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट 5 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक राजकीय पक्षांनी निषेध करत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. अशातच ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘द केरळ स्टोरी’ने रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच बॉक्स ऑफिसवर कमाई करोडोंची कमाई करायला सुरुवात केली आहे.

‘द केरळ स्टोरी’ने तीन दिवसात कमावले ‘इतके’ कोटी

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. आता या चित्रपटाला जवळपास प्रदर्शित होऊन तीन दिवस झाले आहेत. प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. अशातच ‘द केरळ स्टोरी’ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 8.3 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी 11.22 कोटी कमावले आहेत. तसेच तिसऱ्या दिवशी या चित्रपटाने 16.50 कोटी कमावले आहेत. या चित्रपटाने आत्तापर्यंत एकूण 35.75 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

- Advertisement -

सत्यकथेवर आधारित चित्रपट

‘द केरळ स्टोरी’ ची कथा केरळमधील तीन महिलांवर आधारित आहे ज्यांचे धर्मांतर करण्यासाठी दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. जमियत उलेमा-ए-हिंदनेही चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

दरम्यान, या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी या अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेनने केलं असून विपुल अमृतलालने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -