घरमनोरंजन'द केरळ स्टोरी'ने पहिल्या दिवशी कमावले 'इतके' कोटी

‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

Subscribe

सध्या वादाच्या कचाट्यात सापडलेला ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट नुकताच 5 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी अनेक राजकीय पक्षांनी निषेध करत या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. अशातच ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘द केरळ स्टोरी’ने रिलीजच्या पहिल्याचं दिवशी बॉक्स ऑफिसवर कमाई करोडोंची कमाई केली आहे.

‘द केरळ स्टोरी’ने पहिल्या दिवशी कमावले ‘इतके’ कोटी

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे. प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. अशातच ‘द केरळ स्टोरी’च्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडेही समोर आले आहेत. ‘द केरळ स्टोरी’ ने पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 8.3 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

- Advertisement -

सत्यकथेवर आधारित आहे चित्रपट

‘द केरळ स्टोरी’ ची कथा केरळमधील तीन महिलांवर आधारित आहे ज्यांचे धर्मांतर करण्यासाठी दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यासाठी ब्रेनवॉश केले जाते. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट वादात सापडला होता. जमियत उलेमा-ए-हिंदनेही चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

दरम्यान, या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी या अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेनने केलं असून विपुल अमृतलालने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.


हेही वाचा :

अमीर खानला बनवायचाय ‘Gajani’ चा सिक्वल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -