Monday, May 29, 2023
27 C
Mumbai
घर मनोरंजन ‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माचा नंबर सोशल मीडियावर लीक

‘द केरळ स्टोरी’ फेम अदा शर्माचा नंबर सोशल मीडियावर लीक

Subscribe

मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणारा ‘द केरळ स्टोरी’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आता जवळपास 19 दिवस झाले असून केरळ स्टोरी प्रदर्शित झालेल्या इतर चित्रपटापेक्षा उत्तम कमाई करताना दिसत आहेत. या चित्रपटा मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री अदा शर्मा सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. या चित्रपटातील तिने साकारलेल्या भूमिकेचं काहीजण कौतुक करत आहेत तर काहीजण तिला ट्रोल देखील करत आहेत. अशातच, अदाचा नंबर इंस्टाग्रामवर लीक करण्यात आला आहे.

अदा शर्माचा नंबर सोशल मीडियावर लीक

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

अदाचा नंबर इंस्टाग्रामवर लीक करण्यात आला असून तिचा नवा नंबरही लीक करण्यात येईल अशी धमकी तिला देण्यात आली आहे. अदा शर्माची ऑनलाइन माहिती झामुंडा बोल्टे नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर लीक केली होती. आता हे इन्स्टाग्राम अकाऊंट डिएक्टिवेट करण्यात आले आहे. मात्र, आता ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अदा शर्माचे चाहते मुंबई सायबर सेलकडून युजरवर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

- Advertisement -

दरम्यान, या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी या अभिनेत्री महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेनने केलं असून विपुल अमृतलालने या चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित झाला होता.

अदा शर्मा दिसणार ‘या’ चित्रपटात

- Advertisement -

अदा शर्मा लवकरच ‘द गेम ऑफ गिरगिट’ या चित्रपटात दिसणार आहे. यामध्ये ती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात श्रेयस तळपदे देखील दिसणार आहे. हा चित्रपट ब्लू व्हेल चॅलेंजवर आधारित असेल


हेही वाचा :

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ च्या पहिल्या पोस्टरमध्ये आलिया-रणवीरचा हटके लूक

- Advertisment -