घरमनोरंजनThe Kerala Story च स्क्रिनिंग ब्रिटनमध्ये रद्द, कारण...

The Kerala Story च स्क्रिनिंग ब्रिटनमध्ये रद्द, कारण…

Subscribe

सुदीप्तो सेन यांचा ‘द केरळ स्टोरी’ वरुन वाद देशात सुरु आहे. याचीच आग आता UK मध्ये सुद्धा पसरली गेलीय. ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन (BBFC) यांनी या सिनेमाला कोणतेही सर्टिफिकेट दिलेले नाही. याच कारणास्तव भारतीय समुदायातील एका गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर बीबीएफसीने खरेदी केलेली सर्व तिकिटाचे पैसे रिफंड केले आहेत. त्याचसोबत सिनेमाचे लॉन्चिंग ही टाळले आहे. हा सिनेमा युकेत ३१ चित्रपटगृहांत हिंदी आणि तमिळ भाषेत १२ मे रोजी प्रदर्शित करण्यात येणार होता. परंतु सर्व चित्रपटगृहांच्या वेबसाइट्सवर याच्या तिकिटाच्या विक्रीवर बंदी घातली गेलीय. तसेच शो रद्द ही केले गेले.

सलोनी नावाच्या महिलेने सिनेवर्ल्डमध्ये सिनेमा पाहण्यासाठी ३ तिकिटे खरेदी केली होती. परंतु तिला एक ईमेल आला त्यात एज सर्टिफिकेशनच्या कमतरतेमुळे बीबीएफसी द्वारे केरळ स्टोरीची बुकिंग रद्द केले. आम्ही तुम्हाला याचा पूर्ण रिफंड पाठवत आहोत असे ही ईमेल मध्ये लिहिले होते. त्या महिलेने टीओआयला असे सांगितले की, बहुतांश जणांनी विकेंडला हा सिनेमा पाहण्याचा प्लॅन केला होता. 95 टक्के स्क्रिनिंग सुद्धा फुल्ल होती. पण शो रद्द झाला.

- Advertisement -

बीबीएफसीने असे म्हटले की, द केरळ स्टोरीचे अद्याप सर्टिफिकेशन प्रोसेस सुरु आहे. जसे की, याला एज रेटिंगचे सर्टिफिकेट किंवा कंटेट अॅडवान्स मिळाल्यास तर युकेतील चित्रपटगृहांत तो दाखवला जाईल.

UK Distributor सुरेश वरसानी जे 24 Seven FLIX4U चे डायरेक्टर आहेत त्यांनी असे म्हटले की, ही एक चिंतेची बाब आहे. हा सिनेमा बीबीएफसीला बुधवारीच दिला होता. त्याचसोबत त्याचे हिंदी, तमिळ आणि मल्याळम असे ती वर्जन सुद्धा दिले होते.एक त्यांनी बुधवारी आणि अन्य दोन गुरुवारी पाहिले होते. अशातच एज क्लासिफिकेशन त्याच दिवशी व्हायला पाहिजे होते. पण ते झाले नाही. जेव्हा याचे उत्तर मागितले तेव्हा त्यांच्याकडे याचे योग्य कारण सुद्धा नव्हते.

- Advertisement -

त्यांनी पुढे असे म्हटले की, एक सर्टिफिकेट देण्यासाठी तीन पेक्षा अधिक दिवस का लागत आहेत. ते नक्की कळत नाहीय. तसेच युएसए, भारत, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि आयरलँन्डने तर ते पास केलेयं. परंतु काय नक्की समस्या येतेय हेच कळत नाहीयं. युकेतील चित्रपटगृह आणि त्यांचे 40-50 लाखांचे नुकसान झाले आहे. बातमीनुसार, युकेतील हिंदू समुदायाच्या संघटनेने बीबीएफसीला एक पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी अशी विनंती केली आहे की, लवकरात लवकर याबद्दल चौकशी करावी.


हेही वाचा- ‘द केरला स्टोरी’ सिनेमातील अभिनेत्रीचे धक्कादायक विधान; काय आहे प्रकरण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -