घरमनोरंजनकुस्तीचा बुलंद 'आवाज'; गायक आदर्श शिंदे!

कुस्तीचा बुलंद ‘आवाज’; गायक आदर्श शिंदे!

Subscribe

महाराष्ट्रातील मातीतला खेळ कुस्ती चॅम्पियन लीग सुरू होणार असून याकरता अॅन्थन साँग बनवण्यात आले आहे. हे गाणं पार्श्वगायक आदर्श शिंदे यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील अस्सल मातीतला खेळ ‘कुस्ती चॅम्पियन्स लीग’ लवकर सुरू होणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर या खेळाचा जल्लेष पाहायला मिळणार आहे. नुकतेच या लीगसाठीचे अॅन्थम साँग सोशल मीडियवर व्हायरल झाले असून हे गाण सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या दमदार आवाजत ऐकायला मिळत आहे. ‘आला रे आला…’ असे या अॅन्थम साँगला आदर्शसोबत गायिका सुवर्णा तिवारीनेही स्वरबद्ध केले आहे. तर अनुराग गोडबोले यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गीत कौस्तुभ पाठक यांनी लिहिले आहे. तर वादनाला प्रतीक कवळे आणि आदेश मोरे यांनी साथ दिली आहे. हे गाणं चिन्मय हुल्याळकर यांनी मिक्सिंग केले आहे.

- Advertisement -

 

प्रत्येक सामना सुरू होण्याआधी एखाद्या कुस्तीगीरच्या मनातल्या भावना आता माझ्या मनात आहेत. तोच जोश, तोच उत्साह, तीच धाकधूक आणि ऊर्जा. आपल्या सर्वांच्या प्रेमाची ह्या खेळाला आणि आपल्या Kusti Champions League ला गरज आहे कारण, “तुमची आमची कुस्ती खेळ नव्हे संस्कृती”.

- Advertisement -

-आदर्श शिंदे, पार्श्वगायक 

सोनाली आणि नाना यांच्यावर चित्रित गाणं

ढोलताशाच्या गजरात, मराठमोळ्या ठेचात बनवण्यात आलेले हे गाणं अभिनेता नाना पाटेकर आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. राज्यात कुस्ती खेळणाऱ्या महिला आणि पुरुष या दोघांसाठी सुवर्णसंधी असलेल्या या कुस्ती चॅम्पियन लीगच्या प्रमोशनकरता विक्रम जाधव (उपमहाराष्ट्र केसरी), प्राजक्ता पानसरे (राज्यस्तरीय पदक विजेती), कौतुक डाफळे (राष्ट्रीय पदक विजेता), स्मिता पाटील (राष्ट्रीय पदक विजेती), अभिषेक तुर्केवाडकर (महाराष्ट्र चॅम्पियन) आणि देवकी राजपुत (राष्ट्रीय पदक विजेती) हे कुस्ती चॅम्पियन्स मैदानात उतरले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -