घरमनोरंजनजपानमध्येही 'RRR'ची जादू; लवकरच करणार 100 कोटींचा टप्पा पार

जपानमध्येही ‘RRR’ची जादू; लवकरच करणार 100 कोटींचा टप्पा पार

Subscribe

टॉलिवूड सुपरस्टार राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्या बहुचर्चित ‘RRR’ चित्रपटाने भारताचं नाव जगभरात उंचावलं. जगभरातील प्रेक्षकांना हा चित्रपट प्रचंड आवडला शिवाय या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याचं अनेकांकडून कौतुक करण्यात आलं. नुकताच या गाण्याने ऑस्कर पुरस्कार मिळवून कौतुकास्पद कामगीरी केली. याआधी देखील या गाण्याने ‘गोल्डन ग्लोब अवॉर्ड’ जिंकला होता. अशातच, आता या चित्रपटाबाबत आणखी एक जबरदस्त बातमी समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, राजामौलींच्या या RRR चित्रपटाने जपानच्या बॉक्स ऑफिसवर देखील कल्ला करायला सुरुवात केली आहे. जपानमधील प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत.

जपानमध्ये देखील ‘RRR’ चित्रपटाची जादू

राजामौली यांचा ‘RRR’चित्रपट 21 ऑक्टोबर रोजी जपानमध्ये प्रदर्शित झाला होता. जपानमध्ये आत्तापर्यंत या चित्रपटाने एकूण 80 कोटी कमावले आहेत. रिपोर्ट्सच्या मते, जपानमध्ये सर्वाधिक कमाई करणार हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. हा चित्रपट जपानमध्ये एकूण 44 स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी उत्तम प्रतिसाद देत आहेत. लवकरच ‘RRR’जपानमध्ये 100 कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, ‘RRR’ चित्रपट एक पीरियड ड्रामा चित्रपट आहे ज्यामध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरण आदिवासी नेते कोमाराम भीम आणि क्रांतिकारक अल्लुरी सीता रामा राजू यांच्या भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे आलिया भट्टने टॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय अजय देवगण, श्रिया सरन, समुथिरकणी, रे स्टीव्हन्सन, मकरंद देशपांडे आणि ऑलिव्हिया मॉरिस या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसत आहेत. जागतिक बॉक्स ऑफिसवर ‘RRR’ 1,200-1,258 कोटींची कमाई करणारा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी भारतीय चित्रपट ठरला आहे.


हेही वाचा :

खंडणीखोर सुकेश चंद्रशेखरच्या जीवनावर आधारित बायोपिक लवकरच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -