घरमनोरंजनमुख्य आकर्षण प्रथमेश परब

मुख्य आकर्षण प्रथमेश परब

Subscribe

टाईम पास मध्ये दिसलेल्या प्रथमेश परबने पुढे अनेक चित्रपट केले. व्यावसायिक नाटकाबरोबर प्रायोगिक नाटकातही तो दिसला. मधल्या काळामध्ये त्याची चर्चा थांबली होती आणि आता पुन्हा त्याच्या नावाची चर्चा होणार आहे. त्याला कारण म्हणजे दहा बाय दहा हे त्याचे नाटक व्यावसायिक रंगमंचावर आलेले आहे. अशा पार्श्वभूमीवर तो मुख्य आकर्षण असलेल्या टकाटक या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झालेले आहे. भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर, प्रणाली भालेराव, अभिजित आमकर यांचा यात कलाकार म्हणून सहभाग असतानासुद्धा प्रथमेश हा या चित्रपटाचे मुख्य आकर्षण असणार आहे. त्याच्याबरोबर ऋतिका श्रोत्री दिसणार आहे. मिलिंद कवडे याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे. येड्यांची जत्रा, फोर इडियट्स, जस्ट गंमत, शिनमा, एक दोन तीन चार हे त्याचे यापूर्वीचे प्रदर्शित झालेले चित्रपट. प्रत्येक चित्रपट हटके आहे. त्यामुळे टकाटकमध्ये नेमकं काय असणार आहे अशी विचारणा सुजाण प्रेक्षक करण्याची शक्यता आहे. हा चित्रपट वेगळ्या धाटणीचा म्हणजेच सेक्स कॉमेडी अशी या चित्रपटाची ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे. मिलिंदने कथा-पटकथेची जबाबदारी अजय ठाकूरबरोबर स्वीकारलेली आहे. संजय नवगिरे हा या चित्रपटाचा संवाद लेखक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -