‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील ‘या’ अभिनेत्रीचं ठरलं लग्न

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आणि हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी लोकप्रिय अभिनेत्री वनिता खरात सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. मागील काही दिवसांपूर्वी वनिताने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून प्रेमाची कबूली दिली होती. दरम्यान, आता लवकरच वनिता बोहोल्यावर चढणार आहे.

वनिताने तिचा बॉयफ्रेंड सुमित लोंढेसोबत फोटो शेअर करत प्रेमाची कबूली दिली होती. शिवाय आता दोघेही लवकरच लग्न देखील करणार आहेत. वनिताचा बॉयफ्रेंडसोबतचा फोटो पाहून अनेकांनी कमेंट्स करत तिला लग्न कधी करणार आहे? हे विचारलं होतं. वनिता 2023 मध्ये लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. शिवाय आता तिने लग्नाच्या तयारीला सुरुवात देखील केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

वनिताचा बॉयफ्रेंड सुमित लोंढे एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे.दरम्यान, वनिता खरात एक उत्तम अभिनेत्री असून तिने मराठीसोबतच हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. वनिताने शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ या चित्रपटामध्ये काम केले आहे.

 


हेही वाचा :

नवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘हुड्डी’ चित्रपट 2023 मध्ये होणार प्रदर्शित