‘पोन्नियिन सेल्वन 2’ चित्रपट ओटीटीवर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शत

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तमिळ सुपरस्टार चियान विक्रम यांचा नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘पोन्नियिन सेल्वन 2’ चित्रपटाने प्रेक्षकांचे मन जिंकले. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करत आहे. नुकताच या चित्रपटाने 300 कोटींचा टप्पा पार केला. अशातच आता हा ओटीटीवर देखील प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.

‘पोन्नियिन सेल्वन 2’ चित्रपट ओटीटीवर या दिवशी होणार प्रदर्शत

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक मणि रत्नमचा ‘पोन्नियिन सेल्वन 2’चित्रपट 28 जून, 2023 रोजी अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

काय आहे ‘पोन्नियन सेल्वन 2′ची कथा

‘पोन्नियन सेल्वन 2′मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या नंदिनी आणि मंदाकिनी अशा दोन भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘पोन्नियिन सेल्वन 2’मध्ये, नंदिनीने चोल साम्राज्याचा अंत करण्याचे व्रत घेतले आहे. या कथेतील सिंहासनाबाबत सुरू असलेले राजकारण यावेळी महायुद्ध शिगेला पोहोचेल. PS 1 मध्ये चोल शासकांची कथा दाखवण्यात आली होती. आता या भागात चोल शासकांमधील सिंहासनाचे मोठे युद्ध पाहायला मिळेल.

‘पोन्नियन सेल्वन 2′ मध्ये दिसणार हे कलाकार

‘पोन्नियन सेल्वन 2’ चित्रपटात चियान विक्रम, कार्ती, जयम रवी, त्रिशा कृष्णन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक मणिरत्नम यांचा चित्रपट पहिल्या भागाप्रमाणेच कमाई करेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. ‘पोन्नियन सेल्वन’ चित्रपटाने भारतात 250 कोटी आणि जगभरात 450 कोटींची कमाई केली होती.

 


हेही वाचा : 

उर्फीने घातला चक्क च्युंइगमचा टॉप; ट्रोलर्सने उडवली खिल्ली