घरमनोरंजन'सातारचा सलमान' चित्रपट 3 मार्चला होणार प्रदर्शित

‘सातारचा सलमान’ चित्रपट 3 मार्चला होणार प्रदर्शित

Subscribe

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून येत्या ३ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुयोग गोऱ्हे, शिवानी सुर्वे, सायली संजीव, अक्षय टंकसाळे, मकरंद देशपांडे, आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचे नवीन पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले आहे. टेक्सास स्टुडिओज प्रस्तुत, प्रकाश सिंघी निर्मित हा चित्रपट रिलायन्स एंटरटेनमेंटतर्फे प्रदर्शित होणार आहे.

‘स्पप्नं बघितली तरंच खरी होतात’ अशी टॅगलाईन असलेल्या या पोस्टरमध्ये सगळे कलाकार एका हूक स्टेपमध्ये दिसत आहेत. साताऱ्यामध्ये राहणाऱ्या एक सामान्य मुलाची ही कथा आहे, जो हिरो बनायचे स्वप्न बघतोय. त्याचे हे स्वप्न पुर्ण होते का, याचे उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहे.

- Advertisement -

सातारचा सलमानची घोषणा ४ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ ला झालेली.  २०१९ च्या गणेशोत्सवात सातारचा सलमान सिनेमाचं प्रमोशन करण्यात आलेलं. मात्र हा चित्रपट पुढे रखडला. त्यानंतर या चित्रपटाबद्दल कोणतीही चर्चा झाली नव्हती. परंतु आज अचानक सिनेमाचं पोस्टर रिलीज झाल्याने सर्वांच्या मनात आनंद आणि उत्सुकता निर्माण झाली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख निश्चित झाली असून येत्या ३ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

 

- Advertisement -

हेही वाचा :

“I प्रेम U’ चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -