या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार ‘हे’ चित्रपट रिलीज

नवीन महिन्याची सुरूवात होताच प्रेक्षक नवनवीन चित्रपटांची आणि वेब सीरीजची वाट पाहू लागतात. कोरोनाआधी प्रेक्षकांचा ओटीटीकडे जास्त प्रमाणात कल नव्हता, कोरोनाकाळात आपल्या मनोरंजनासाठी प्रेक्षक चित्रपटगृह खुले होण्याची वाट पाहत होते. परंतु आता ओटीटी प्लॅटफॉर्मने प्रेक्षकांना घरबसल्या स्वतःचे मनोरंजन करण्याची संधी दिली आहे. ओटीटीवर आता येत्या आठवड्यात अनेक वेब सीरीज आणि चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अॅक्शन-थ्रिलर, कॉमेडी आणि रोमाँटिक अश्या वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट आणि वेब सीरीज तुम्ही या आठवड्यात पाहू शकता.

थार (Thar)


दिग्दर्शक राज सिंह यांचा ‘थार’ चित्रपट येत्या ६ मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाला अभिनेते अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर यांनी प्रोड्यूस केले आहे. या चित्रपटात अनिल कपूर पोलीस आणि हर्षवर्धन कपूर स्मगलरची भूमिका साकारणार आहे.

होम शांती (Home)


‘होम शांती’ ही गोष्ट एका कुटुंबाची आहे, जे खूप वर्षापासून एका सरकारी क्वाटरमध्ये राहिल्यानंतर स्वतःचे पहिलं घर बनवतात. आता हे सरकारी क्वाटर खाली करण्यासाठी फक्त तीन महिने बाकी आहेत. सुप्रिया पाठक आणि मनोज पाहवाचा हा शो ६ मे रोजी डिजनी हॉटस्टारवर येईल.

झुंड (Jhund)


नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपट ६ मे रोजी zee5 वर रिलीज होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत आहेत.

पेट पुराण (pet puran)


सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकरची मुख्य भूमिका असलेला ‘पेट पुराण’ ६ मे sony Liv वर प्रदर्शित होणार आहे.

 

 

Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीच्या घरात पुन्हा सुरू होणार कल्ला