‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील बहुप्रतिक्षित ‘केसरिया’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला; गाणं पाहून सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

सध्या हे गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ट्वीटरवर #Kesariya सध्या ट्रेंड होत आहे. प्रेक्षक या गाण्याचे खूप कौतुक करत आहेत

गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या बहुचर्चित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटातील बहुप्रतिक्षित गाणं केसरिया आता रिलीज करण्यात आलं आहे. मागील अनेक दिवसांपासून प्रेक्षक या गाण्याची आतुरतेने वाट पाहत होते. सध्या हे गाणं मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून ट्वीटरवर #Kesariya सध्या ट्रेंड होत आहे. प्रेक्षक या गाण्याचे खूप कौतुक करत आहेत. मुख्य म्हणजे हे गाणं अरजीत सिंह याने गायलेलं आहे, त्यामुळे या गाण्याला खऱ्या अर्थाने चार चाँद लागलेले आहेत.

गाण्यात रणबीर- आलियाचा रोमांस
खरंतर ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात रणबीर आणि आलिया पहिल्यांदा एकत्र दिसून येणार आहेत. शिवाय अशातच हे चित्रपटातील पहिलं गाणं आहे, त्यामुळे हे खूप खास असणार आहे. त्यामुळेच रणबीर आणि आलियाचे चाहते गाणं पाहून खूप खूश झाले आहेत. या गाण्याला अरजीत सिंह आणि निकिता गांधी यांनी गायले आहे. तसेच या गाण्याचे संगीत प्रीतम आणि बोल अमिताभ भट्टाचार्य यांनी लिहिलेले आहेत.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

सोशल मीडियावर चाहते या गाण्याला खूप पसंती देत आहेत. या गाण्याचे अनेक स्क्रीनशॉट्स आणि क्लिप्स सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. रणबीर-आलियाचे चाहते दोघांचा रोमांस पाहून कौतुकाचा वर्षाव करत आहेत. तर काही चाहते म्हणत आहेत की, हे गाणं या वर्षातील सर्वात हिट गाणं असणार आहे. रणबीर आणि आलिया त्यांच्या पहिल्या एकत्र चित्रपटातील हे पहिलं रोमाँटिक गाणं आहे, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांसाठी हे खूप खास आहे.

‘ब्रह्मास्त्र’ या दिवशी होणार प्रदर्शित
‘ब्रह्मास्त्र’मध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय हे सुद्धा महत्वाची भूमिका साकारताना दिसून येतील. तसेच अभिनेता शाहरूख खान सुद्धा चित्रपटात कॅमियो रोलमध्ये दिसून येईल. ९ सप्टेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार असून हा हिंदी व्यतिरिक्त, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत रिलीज होणार आहे.


हेही वाचा :अमृता फडणवीस सांगतायत ‘प्यार का गम’, सोशल मीडियावर आगामी गाण्याची चर्चा