2014 साली प्रदर्शित झालेला ‘कार्तिकेय’ चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ पाडली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, आता याचं चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. मागील 7 वर्षापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या सिक्वेलची आतुरतेने वाट पाहत होते. या चित्रपटाच्या दुसऱ्या सिक्वेलची बातमी समोर येताच या चित्रपटाचे चाहते खूप खूश झाले आहेत.
अभिनेता निखिल सिद्धार्थ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसून येईल. तसेच अभिनेते अनुपम खेर देखील या चित्रपटामध्ये एक महत्वाची भूमिका साकारतील.
View this post on Instagram
या चित्रपटाते दिग्दर्शन चंदू मोंडेती यांनी केलं आहे. तसेच विश्व प्रसाद आणि अभिषेक अग्रवालने चित्रपटाचा निर्मिती केली आहे. नुकतेच रिलीज झालेल्या या चित्रपटाचे ट्रेलर पाहून प्रेक्षक चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत.
आगामी ‘कार्तिकेय 2’ मध्ये अभिनेता निखिल सिद्धार्थ, अनुपम खेर, अनुपमा परमेश्वरन, श्रीनिवास रेड्डी , विवा हर्षा आणि आदित्य मेनन यांसारखे कलाकार या चित्रपटामध्ये दिसून येतील. हा चित्रपट हिंदीसह, तेलगू, कन्नड, तमिळ आणि मल्याळम या पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे. हा चित्रपट बिग बजेट चित्रपट असून 13 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.