Saturday, April 10, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'सारेगमप लिटिल चॅम्स' चे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

‘सारेगमप लिटिल चॅम्स’ चे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

या कार्यक्रमाने छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली होती. सोबतच या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राला अनेक लिटिल चॅम्स मिळाले होते.

Related Story

- Advertisement -

काही वर्षांपूर्वी झी मराठी वाहिनीवर लोकप्रिय ठरलेला रिअॅलिटी शो ‘सा रे ग म प’ लिटिल चॅम्स पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाने छोट्या पडद्यावर प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली होती. सोबतच या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राला अनेक लिटिल चॅम्स मिळाले होते. रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर या लिटिल चॅम्सनी आपल्या जादुई सुरांनी सुरैल सांगितिक मैफिलच घरबसल्या रसिकप्रेक्षकांना दिली होती. आता मोठे झाल्यावरही हे गायक श्रोत्यांच्या मनावर राज्य करत आहे. आता येत्या नवीन पर्वात हे कलाकार ज्युरीच्या भूमिकेत दिसणार आहे. झी मराठी वाहिनीने या नव्या पर्वाचा प्रोमो शेअर करत याची माहिती दिली आहे. यात काही लहान मुले दिसत आहेत. तर एक मुलगी गाणं गात आहे. ‘सारेगमप लिटिल चॅम्स’चे हे तिसरे पर्व असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

 येत्या २९ एप्रिलपासून हा शो सुरु होणार आहे. मागील भागात या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी जोशी ने केले होते. या पर्वात मृण्मयी गोडबोले सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. महाराष्ट्रातील उत्तमोत्तम गायक शोधणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे लहान गायकांसाठी सारेगमप पुन्हा एकदा नवी उमेद घेवून येणार आहे.


- Advertisement -

हे वाचा- सोनाली कुलकर्णी ‘क्राइम पेट्रोल’मधून करणार नागरिकांना सतर्क

- Advertisement -