Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन नवी रहस्यमय मालिका 'चंद्रविलास' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

नवी रहस्यमय मालिका ‘चंद्रविलास’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

ही गोष्ट आहे ‘चंद्रविलास’ या दोनशे वर्षांपूर्वीच्या वास्तूची आणि त्यात अडकलेल्या बाप-लेकीची. अनंत महाजन आणि त्याची मुलगी शर्वरी गावातल्या एका जुन्या वाड्यात जातात आणि तिथे अडकून पडतात. ते दोघं तिथे पोहोचल्यापासून अनाकलनीय घटनांची एक मालिकाच सुरू होते. या घटनांमागे असतं, ते या वास्तूत गेल्या दोनशे वर्षांपासून वास्तव्याला असलेला एक आत्मा. त्या आत्म्याला नेमकं काय हवंय, त्यानं कोणत्या उद्देशानं या दोघा वडील-मुलीला त्या वाड्यात अडकवून ठेवलंय, त्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तो आत्मा कोणकोणत्या गोष्टी घडवून आणणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

या सगळ्या दरम्यान त्यांना आणखी कोण-कोण भेटणार आहे आणि त्या आत्म्याच्या तावडीतून सुटण्यासाठी त्या दोघांना कोणत्या दिव्यातून जावं लागणार आहे, ह्या सगळ्याचा उलगडा या मालिकेतून होणार आहे. चंद्रविलासमधला वास्तव्याचा काळ हा अनंत आणि शर्वरी या बाप-लेकीमधल्या प्रेमाची परीक्षा पाहणारा कसोटीचा काळ असणार आहे. दुष्टशक्तींच्या अचाट सामर्थ्यापुढे वडील-मुलीतल्या प्रेमाचा निभाव लागेल का, अनंत आपल्या लाडक्या मुलीला संकटातून वाचवू शकेल.


- Advertisement -

हेही वाचा :

अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट फ्लॉप तर शाहरुखच्या ‘पठाण’चा जलवा कायम

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -