घरमनोरंजन'मराठी बिग बॉस 3' चा नवा सिझन लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

‘मराठी बिग बॉस 3’ चा नवा सिझन लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

‘बिग बॉस मराठी ३’ या आगामी सिझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकरच करणार असल्याची सर्वांना खात्री झाली आहे.

कलर्स मराठी वर प्रसारीत होणारी सर्वात वादग्रस्त,चर्चित,तसेच प्रेक्षकांच्या आवडीची मालिका म्हणजे ‘बिग बॉस मराठी’. ‘बिग बॉस मराठी’चं पहिलं पर्व १५ एप्रिल २०१८ रोजी पार पडलं. आणि तितक्याच धमाकेदारपणे गाजलं. या पर्वामध्ये अभिनेत्री मेघा धाडे विजयी ठरली होती. मालिकेने संपुर्ण टीआरपी रेट स्वत: कडे खेचून घेतला होता. त्यानंतर पहील्या पर्वाची झिंग प्रेक्षकांच्या डोक्यातून उतरत नाही तोवर दुसरं पर्व भेटीला आलं. तर दुसरा सिझनही तितक्याच जोशाने गाजला होता. या दुसऱ्या सिझनमध्ये शिव ठाकरेने ‘बिग बॉस मराठी 2’ ची ट्रॉफी जिंकली. शोमधील स्पर्धंकांची ओळख संपुर्ण महाराष्ट्रभर झाली. त्यामुळे आता प्रेक्षक तिसऱ्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतच कलर्स मराठी ने ‘बिग बॉस मराठी ३’च्या आगामी पर्वाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

- Advertisement -

कलर्स मराठीने त्यांच्या सोशल मीडीया अकांऊटवर एक व्हिडीओ शेअर करत “बिग बॉस मराठी ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे”. तसेच ‘दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, कारण येतोय बिग बॉस ३. लवकरच कलर्स मराठी ३वर’ असे कॅप्शन दिले आहे. तसेच शो मधिल होस्ट तसेच अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी देखील ‘बिग बॉस मराठी ३’ संदर्भात एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘त्याच्यासोबत मी परत येतोय… तुम्ही तयार रहा’ असे म्हंटले आहे. त्यामुळे ‘बिग बॉस मराठी ३’ या आगामी सिझनचे सूत्रसंचालन महेश मांजरेकरच करणार असल्याची सर्वांना खात्री झाली आहे.

प्रेक्षकांना बिग बॉस पर्वात कोण कोण स्पर्धक सहभागी होणार आहे याची ऊत्सुकता सर्वाधिक असते. तसेच घरात कोणते टास्क रंगणार आणि यंदाच्या पर्वात नेमकी कोणती थिम असणार? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहे. आता ‘बिग बॉस मराठी ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते.

- Advertisement -


हे हि वाचा – क्रिकेटपटू श्रीसंतची मैदानातून थेट बॉलिवूडमध्ये एंट्री,‘या’ सिनेमात करणार लीड रोल

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -