सुशांत सिंह राजपूत प्रकरणात १२ जुलै रोजी होणार पुढील सुनावणी

कोर्टाने अजून रियावर कोणताही आरोप निश्चित केला नाही. या खटल्याची सुनावणी १२ जुलै रोजी होणार आहे

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे जेव्हा निधन झाले होते. तेव्हा त्याच्या चाहत्यांपासून सिनेसृष्टीतील कलाकारांना मोठ्ठा धक्का बसला होता. कारण त्याचा मृत्यू सामान्य नव्हता. यासंबंधात अनेक प्रकरणं जोडली गेली होती. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड दोन गटांमध्ये विभागला गेला होता. यातील एका गटावर सुशांतवर अत्याचार केल्याचा आरोप केला जात होता. तर दुसरा गट सुशांत सिंहसाठी न्याय मागत होता. या प्रकरणावरून सोशल मीडियावर खूप वादविवाद सुरू होते. तसेच या केसमध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांचे नाव देखील आले होते. याशिवाय यामध्ये ड्रग्ज प्रकरण देखील समोर आले होते. आता देखील सुशांत सिंह राजपूतच्या केसमध्ये नवीन अपडेट समोर आले आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने आता असं काही केले आहे, ज्याची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून वाट पाहत आहेत.

रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल
२०२० मध्ये बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने जगाचा निरोप घेतला, मात्र त्याच्या जाण्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. अनेक दिवसांनंतर आता या केससंबधात नवीन अपडेट समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू आणि ड्रग्ज प्रकरणाशी जोडल्यामुळे मुंबईच्या विशेष न्यायालयात अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती यांना दाखल करण्यात आलं. सूत्रांच्या मते, कोर्टाने अजून रियावर कोणताही आरोप निश्चित केला नाही. या खटल्याची सुनावणी १२ जुलै रोजी होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

 दरम्यान, सुशांत सिंह राजपूत १४ जून २०२० रोजी मुंबईमधील राहत्या घरी सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणात रिया चक्रवर्तीला सप्टेंबर २०२० मध्ये ताब्यात घेण्यात आलं. अटक झाल्याच्या एक महिन्यानंतर तिला बॉम्बे हाय कोर्टाने बेल दिली होती. आता १२ जुलै रोजी या केसमध्ये नक्की काय होईल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

 


हेही वाचा :लै हस्तोय च्यायाला….आमदार, किरण मानेंची फेसबुक पोस्ट चर्चेत