घरमनोरंजनभाईजानला ई-मेलद्वारे धमकी, संशयिताला जोधपूरमधून अटक

भाईजानला ई-मेलद्वारे धमकी, संशयिताला जोधपूरमधून अटक

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मागील वर्षापासून ते आत्तापर्यंत अनेकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तेव्हापासून सलमानच्या सुरक्षेत वाढ देखील करण्यात आली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी सलमानला ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी या व्यक्तीला राजस्थानमधून अटक केली आहे. मात्र, ती लॉरेन्स बाश्नोई गँगशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे.

पोलिसांनी आरोपीला जोधपूर येथून अटक केली

सलमान खानला यापूर्वी ई-मेलद्वारे धमकी देण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचले आणि तपास सुरू करण्यात आला. सलमान खानला धमकीचा मेल राजस्थानमधील जोधपूरमधून पाठवण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पुढील कारवाई करत स्थानिक पोलिसांनी कदराम बिश्नोई याला अटक केली असून धमकीचा ई-मेल का पाठवण्यात आला आणि त्याचा लॉरेन्स विश्नोई टोळीशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

- Advertisement -

मात्र, काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार ज्या ई-मेल आयडीवरून सलमानला धमकीचा मेल पाठवला गेला होता, हा यूकेमधील एका मोबाईल नंबरशी जोडलेले असल्याचं कळलं होतं. पोलिसांनी हा नंबर ज्या व्यक्तीच्या नावावर नोंदवला आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आता हा मेल जोधपूर येथील असल्याचं समोर आलं आहे.

सलमान खानला मारने लॉरेन्स बिश्नोईचे उद्दिष्ट

दरम्यान, गेल्या वर्षी देखील गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईने सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. बिश्नोई म्हणाला होता की, सलमानला मारणे हे त्यांचे एकमेव उद्दिष्ट आहे आणि लहानपणापासूनच त्याच्या मनात सलमानबद्दल राग आहे. सलमानने आपल्या बिकानेर येथील मंदिरात समाजातील लोकांची माफी मागावी अन्यथा ठोस उत्तर दिले जाईल, असेही बिष्णोई म्हणाला होता.

- Advertisement -

 


हेही वाचा :

बहुप्रतिक्षित ‘पोन्नियन सेल्वन 2′ चा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -