Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन बिग बॉसच्या घरातील फोटो झाले व्हायरल, राशीचक्रावर आधारीत आहे घराचा रंग

बिग बॉसच्या घरातील फोटो झाले व्हायरल, राशीचक्रावर आधारीत आहे घराचा रंग

यंदाच्या सिजनचे भविष्य काय असणार आहे हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे.

Related Story

- Advertisement -

हिंदी टेलिव्हीजनवरील सर्वात प्रसिद्द तसेच वादग्रस्त रियालिटी शो ‘बिग बॉस’च्या चाहत्यांसाठी यंदा भरपेट मनोरंजनाची मेजवाणी मिळणार असल्याचे दिसतेय. नुकतच बिग बॉस ओटीटीवर येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. यामुळे चाहत्यांमध्ये या नव्या सिजनची प्रचंड उत्सुकतता लागून राहीली आहे. अशातच आता बिग बॉसचा सिजन बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर होस्ट करणार असल्याची महत्वपुर्ण माहिती समोर येत आहे. या वेळची बिग बॉसची थीम काही हटके असणार आहे असा अंदाजा आता प्रेक्षकांना सुद्धा आला आहे. यामुळे प्रेक्षकांमध्येही नव्या सीजनबद्दल उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यंदाचा बिग बॉस अनेक गोष्टींमुळे खास ठरणार आहे. कारण हा शो आता प्रीमियर टीव्हीवर होणार नाही, तर ओटीटीवर प्रदर्शित केला जाणार आहे. आता बिग बॉसच्या घरातील काही फोटो समोर आले आहेत या फोटोमध्ये  घरात डार्क कलरची थीम वापरण्यात आल्याचे दिसतेय तसेच घरामध्ये खाली डबल बेड व त्याच्याच वरती सिंगल बेडची रचान करण्यात आली आहे. तसेच घराच्या भिंतीवर राशीभविष्यामधील रशीचक्रांचे चित्र रंगवण्यात आले आहे. यामुळे यंदाच्या सिजनचे भविष्य काय असणार आहे हे लवकरच प्रेक्षकांना कळणार आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच सलमान खानने बिग बॉस ओटीटीचा पहिला प्रोमो रिलीज केला होता. यावरून आता शोमधील स्पर्धकांच्या नावाच्या चर्चा रंगू लागल्या आहे. यंदाच्या सीजनमध्ये काही सामान्य व्यक्ती सुद्धा दिसून येणार आहेत. यंदा ‘बिग बॉस ओटीटी के मजे लूट, पहली बार स्टार्टिंग ओनली ऑन वूट.’, अशी टॅगलाईन ठेवण्यात आली आहे.


हे हि वाचा – HBD: बॉलिवूडमध्ये एंट्री करण्यापूर्वी कियारा अडवाणीने बदलले होतं स्वत:चं नाव,जाणून घ्या खरे कारण

- Advertisement -