श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी ‘प्रेमाचं कॉकटेल’ चित्रपटाचे पोस्टर लाँच

प्रेमकथेचा वेगळा पदर उलगडून दाखवणाऱ्या “प्रेमाचं कॉकटेल” या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी लाँच करण्यात आलं. उत्तम स्टारकास्ट असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुढील महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

दत्ता इंद्रजित म्हस्के यांनी “प्रेमाचं कॉकटेल”ची निर्मिती केली आहे. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र बोरकर करणार आहेत. चित्रपटात सक्षम कुलकर्णी, मानिनी दुर्गे, शिवराज वाळवेकर, आरती शिंदे, अनिल नगरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रोहित नागभिडे यांचे संगीत, रोहन पाटील यांचे संकलन, करण तांदळे छायांकनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. कार्यकारी निर्माता म्हणून सुमीत कुलकर्णी काम पाहणार आहेत.

ग्रामीण तरुणाईच्या स्वप्नांची शहरात होणारी घुसमट आणि जीवघेणी स्पर्धा कशी तरुणाईला आपल्या झगमगाटात अडकवते.शहरांनी गिळंकृत केलेलं गावपण आणि आभासी स्वप्नांचा पाठलाग कुठल्या थराला घेऊन जातो ह्यांची सस्पेन्स थ्रिलर गोष्ट म्हणजे प्रेमाचं कॉकटेल असे लेखक दिग्दर्शक महेंद्र बोरकर यांनी सांगितले. उत्तम स्टारकास्ट, मजेशीर गोष्ट यांचा मिलाफ असलेल्या चित्रपटाचं पोस्टरही लक्षवेधी आहे. त्यामुळे चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.


हेही वाचा :

जान्हवी कपूरचं फोटोशूट पाहून नेटकऱ्यांना आली स्मिता पाटील यांची आठवण