प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाचा पोस्टर झाला ट्रेंड

होंबाळे फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित, प्रशांत नील दिग्दर्शित आणि पॅन इंडिया सुपरस्टार प्रभास अभिनीत ‘सालार’ हा 2023 मधील सर्वात बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. प्रभास आणि प्रशांत नील यांच्या चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या सहकार्यांपैकी एक असलेला बहुप्रतिक्षित ‘सालार’हा चित्रपट 2023 हे वर्ष ‘साल नही सालार है’ असा दावा करतो. अशातच, ‘सालार’ हा देशातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे यात शंका नाही. तसेच, हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा फिल्म इव्हेंट आहे आणि बाहुबली फ्रँचायझीसह चिन्हांकित केलेले यश लक्षात घेता प्रभासचे मोठे पुनरागमन म्हणून याला ओळखले जात आहे.

अशातच, हा चित्रपट अनेक कारणांमुळे मोठा आहे, आणि त्यापैकी एक कारण म्हणजे प्रभासची ड्रीम टीम आणि प्रशांत नीलसोबत केलेली हातमिळवणी. तसेच, ‘सालार’या चित्रपटासाठी प्रभास आणि प्रशांत नील पहिल्यांदाच एकत्र काम करत असून मनोरंजन इंडस्ट्रीसाठी हा चित्रपट गेम चेंजर ठरेल अशी अपेक्षा आहे. ‘सालार’हे भारतातील दोन सर्वात मोठ्या फ्रँचायझी, ‘बाहुबली’ आणि ‘केजीएफ’ यांचे महत्त्वाकांक्षी सहकार्य आहे कारण होंबाळे फिल्म्स, ‘केजीएफ’चे निर्माते, ‘केजीएफ’चे दिग्दर्शक, ‘केजीएफ’चे टेक्निशियन आणि ‘बाहुबली’चे स्टार पहिल्यांदाच भारतीय प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि 2023 मध्ये आणखी एक ब्लॉकबस्टर चित्रपट देण्यासाठी एकत्र येत आहेत. अशातच, ‘केजीएफ’, ‘केजीएफ २’ आणि ‘कांतारा’यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांची निर्मिती करणारा होंबाळे फिल्म्स 2023 मध्ये ‘सालार’ चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी सज्ज आहे.

दरम्यान, अपडेट नुसार असे समजते की होंबाळे फिल्म्सद्वारा निर्मित ‘सालार’हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणावर बनवला असून याचे बजेट 400+ कोटी रुपये इतके आहे. तसेच, केजीएफची डायनॅमिक टीम आणि टेक्निशियन देखील ‘सालार’चा एक भाग आहेत, त्यामुळे ‘सालार’चा एरा सुरु झाला आहे असे म्हणता येईल. पॅन इंडिया सुपरस्टार प्रभास चा ‘सालार’हा चित्रपट 28 सप्टेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.