घरमनोरंजनराज्यपाल कोश्यारी यांनी केले सामाजिक विषयावर आधारलेल्या 'सोसायटी'चे पोस्टर लाँच

राज्यपाल कोश्यारी यांनी केले सामाजिक विषयावर आधारलेल्या ‘सोसायटी’चे पोस्टर लाँच

Subscribe

‘सोसायटी’ चित्रपटाचे पोस्टर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते लाँच करण्यात आले. पोस्टर लाँचिंगचा कार्यक्रम राज्यपाल भवनात पार पडला. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यपाल भवनात आयोजित कार्यक्रमात असे म्हटले की, समाजाचा आरसा असणाऱ्या चित्रपटांची निर्मिती झाली पाहिजे. मात्र सध्या बहुतेक चित्रपट पाश्चिमात्य संस्कृतीवर आधारलेले आहेत, तर अस्पृश्यांवर सतत चित्रपट बनवण्याची देखील आवश्यकता आहे. आजचे तरूण भारतीय संस्कृती आणि समाजाच्या अशा पैलूपासून दूर जात आहे. त्यामुळे त्यांना याच्याशी जोडून ठेवणे गरजेचे असून तरूणांना अशा भारतीय संस्कृतीशी जोडलेले ठेवणे आणि अशा कथांकडे आवर्जून लक्ष देणे हे चित्रपट निर्मात्यांची जबाबदारी आहे.

राज्यपाल यांनी ‘सोसायटी’ चित्रपटाचे पोस्टर लाँच केल्यानंतर चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले. यावेळी, चित्रपटाचे निर्माता राजेश मोहंती, लेखक आणि चित्रपटाचे दिग्दर्शक धीरज सार्थक, याशिवाय चित्रपटाचे अभिनेते आयआरएस उपायुक्त अन्वेश आणि अभिनेत्री सपना पाटी उपस्थित होते, एसआर एंटरप्रायझेसच्या बॅनरखाली निर्मिती झालेल्या या चित्रपटाचे संगीत अन्वेश यांनीच दिले आहेत.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, ‘सोसायटी’ हा चित्रपट खऱ्या घटनेवर बनलेला असून समाजाचे असे एक सत्य सांगतो. अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला खरं वास्तव दाखवतात पण त्या विषयाला चित्रपटात साकारता येणं अशक्य होते, तसेच तसा प्रयत्न फार कमी होताना दिसतो. या चित्रपटात दाखवण्यात आले आहे की समाजात राहणाऱ्या लोकांची मानसिकता एका रात्रीत बदलत नाही. त्यासाठी खूप वेळ लागतो. ही कथा एका अशा माणसाची आहे ज्याला सामाजिक आणि मानसिक समस्या असते. या व्यक्तीचे सामान्य व्यक्तिमत्व एका विशिष्ट परिस्थितीत बदलते आणि त्यानंतर तो धोकादायक पद्धतीने वागू लागतो. या चित्रपटात अशी प्रेमकथा आहे जी प्रेक्षकांना हैराण करून सोडते.

या चित्रपटात आयआरएस उपायुक्त अन्वेश यांनी केवळ मुख्य भूमिका साकारली नाही तर त्यांनी या चित्रपटासाठी संगीत देखील दिले आहे. या चित्रिपटाचे दिग्दर्शन आणि लेखन जेष्ठ पत्रकार धीरज सार्थक यांनी केले आहे. ते नेहमी सामाजिक विषयांवर भाष्य करणारे चित्रपट आणि लेखन करत असतात.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -