घरमनोरंजन‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित

Subscribe

आपल्या राशीचक्रातल्या बारा राशी या अतिशय मनोरंजक आहेत. प्रत्येक राशीचं स्वभाव वैशिष्ट्य, सौंदर्य आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या बारा राशींचा आणि मानवी भावभावनांचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे या विविध राशींच्या व्यक्तिरेखांना अभ्यासणे हे सुद्धा खूपच मनोरंजक आहे. या सगळ्याच धमाल चित्रण असलेला ‘आलंय माझ्या राशीला’ हा मराठी चित्रपट १० फेब्रुवारीला आपल्या भेटीला येणार आहे. मराठी सिनेसृष्टीच्या अनेक दिग्ग्ज कलाकारांच्या भूमिका असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. आनंदी वास्तू आणि साईकमल प्रोडक्शन निर्मित ‘आलंय माझ्या राशीला’ चित्रपटाचं दिग्दर्शन अजित शिरोळे यांनी केलं आहे. सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि अश्विनी पिंपळकर चित्रपटाचे निर्माते आहेत.

चित्रपटाच्या वेगळया विषयाचे कौतुक करीत राजसाहेब ठाकरे यांनी चित्रपटाला खूप शुभेच्छा दिल्या. यावेळी चित्रपटातील अभिनेत्री निर्मिती सावंत, निर्माते आनंद पिंपळकर, सहनिर्माते दिलीप जाधव, युवा अभिनेता प्रणव पिंपळकर, दिग्दर्शक अजित शिरोळे उपस्थित होते.

- Advertisement -

‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटात चिन्मय मांडलेकर, अलका कुबल, मोहन जोशी, निर्मिती सावंत, अतुल परचुरे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, उषा नाईक, भार्गवी चिरमुले, अश्विनी कुलकर्णी, पौर्णिमा अहिरे, दिगंबर नाईक, संग्राम चौगुले, स्वप्निल राजशेखर‌, सिद्धार्थ खिरीड यांच्या भूमिका आहेत. अभिनेता प्रणव पिंपळकर या चित्रपटातून मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करतोय.

‘आलंय माझ्या राशीला’ या चित्रपटाचे लेखन हेमंत एदलाबादकर यांनी केलं आहे. सहनिर्माते दिलीप जाधव आहेत. क्रिएटिव्ह प्रोड्युसर ओंकार माने, प्रणव पिंपळकर आहेत. गीते गुरु ठाकूर, अभय इनामदार, कौतुक शिरोडकर यांनी लिहिली आहेत. छायांकन कृष्णा सोरेन यांचे तर संकलन विजय खोचीकर यांचे आहे. पार्श्वसंगीत मिलिंद मोरे यांचे आहे. वेशभूषा मैत्रीयी शेखर आणि संगीता तिवारी यांची आहे. ध्वनी अशोक झुरुंगे तर नृत्य सुजितकुमार, नरेंद्र पंडित, प्रितम पाटील यांचे आहे. साहसदृश्ये अकबर शरीफ तर कलादिग्दर्शनाची जबाबदारी वासू पाटील यांनी सांभाळली आहे. व्हीएफएक्सची जबाबदारी श्रेयस केदारी, रितेश पवार यांनी सांभाळली आहे.

- Advertisement -

हेही वाचा :

‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटात नाना पाटेकर साकारणार मुख्य भूमिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -