Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन मला मानसिक आणि शारीरिक त्रास... समंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं कारण आलं...

मला मानसिक आणि शारीरिक त्रास… समंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटाचं कारण आलं समोर

Subscribe

टॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘शाकुंतलम’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. समंथा चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत असते. पती नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाल्यानंतर देखील समंथाने सोशल मीडियावरुन मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, समंथा आणि नागा चैतन्य नक्की कोणत्या कारणामुळे वेगळे झाले याचे कारण कोणालाही ठाऊक नव्हते. दरम्यान, आता याप्रकरणाचा खुलासा करण्यात आला आहे.

समंथा आणि नागा चैतन्यच्या घटस्फोटावर अनेकजण वेगवेगळे तर्कवितर्क लावत होते. मात्र, आता त्यांच्या घटस्फोटाचे खरे कारण सर्वांसमोर आले आहे. चित्रपट समीक्षक उमेर संधूने याबाबत खुलासा केला आहे. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिलंय की, “समंथाच्या म्हणण्यानुसार, नागा चैतन्यने तिच्यासोबत खूप गैरवर्तन केले. तो एक वाईट नवरा आहे. त्याच्यामुळे मला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. मी गरोदर देखील होते पण माझा गर्भपात झाला. देवाचे खूप आभार, मी घटस्फोट घेऊन त्याच्यापासून वेगळी झाले.” असं चित्रपट समीक्षकाने लिहिलं आहे. मात्र, यावर समंथा किंवा नागा चैतन्यची कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.

अशी होती समंथा आणि नागा चैतन्यची लव्हस्टोरी

- Advertisement -

समंथा आणि नागा चैतन्य यांची पहिली भेट 2009 मध्ये ‘ये माया चेसावे’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. तिथे त्यांची छान मैत्री झाली. त्याचेच रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. 2016 मध्ये, दोघे एकत्र सुट्टीवर गेले होते, जिथे नागा चैतन्यने समंथाला खूप रोमँटिक पद्धतीने प्रपोज केले. 2017 मध्ये अत्यंत शाही पद्धतीने त्यांनी लग्न देखील केले. मात्र, 4 वर्षातच 2021 मध्ये दोघांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

 


- Advertisement -

हेही वाचा :

शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’ प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisment -