अंजलीबाई-राणादा यांचा पार पडला शानदार विवाह सोहळा

मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय ठरलेल्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर ही जोडी आता खऱ्या आयुष्यातील पती-पत्नी झाली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. दरम्यान, आज (2 डिसेंबर) अक्षया आणि हार्दिक विवाह बंधनात अडकले आहेत.

कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थित अक्षया -हार्दिक यांचा पुण्यामध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. यावेळी अक्षयाने लाल रंगाची सुंदर नऊवारी साडी नेसली होती. तर हार्दिकने कुर्ता आणि धोतर घातले होते. या लूकमध्ये दोघेही शाही अंदाजात दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Media. (@marathi.media)

मागील अनेक दिवसांपासून अक्षया आणि हार्दिकच्या लग्नाची तयारी सुरु होती. दोघांच्या हळदीचे आणि मेहंदी सोहळ्याचे देखील अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

मागील काही महिन्यांपूर्वी दोघांचा साखरपुडा मोठ्या थाटामाटात पार पडला होता. दोघांनी एकमेकांना आयुष्यातील जोडीदार म्हणून निवडल्याचं पाहून त्यांचे चाहते आणि मराठी मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार आश्चर्यचकित झाले होते. दरम्यान, आता दोघांच्या लग्नाची बातमी कळताच त्यांचे चाहते देखील खूश झाले आहेत.

 


हेही वाचा :

फिफा वर्ल्डकपमध्ये परफॉर्म करताना नोरा फतेहीने केला तिंरग्याचा अपमान