घरमनोरंजनबाळाने जन्म होताच गमावला जीव, बी प्राकने जड अंतःकरणाने लिहिली ही पोस्ट

बाळाने जन्म होताच गमावला जीव, बी प्राकने जड अंतःकरणाने लिहिली ही पोस्ट

Subscribe

बी प्राकने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत खुलासा करत एक भावूक पोस्ट लिहून माहिती दिली आहे

गायक आणि संगीत दिग्दर्शक असलेला बी प्राकबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. बी प्राक याची पत्नी मीरा बच्चन हिने आपल्या दुसऱ्या बाळाला नुकताच जन्म दिला, मात्र बाळाचा जन्माचा जन्म होताच बाळाने आपला जीव गमावला. बी प्राकने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर याबाबत खुलासा करत एक भावूक पोस्ट लिहून माहिती दिली आहे. सध्या बी प्राकची ही पोस्ट खूप चर्चेत आहे.

बी प्राकने लिहिली पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by B PRAAK(HIS HIGHNESS) (@bpraak)

- Advertisement -

 बी प्राकने त्याच्या इंस्टाग्राम वर एक पोस्ट लिहिली, “खूप जड अंतःकरणाने मी ही गोष्ट सांगत आहे की, आमच्या नवजात बाळाचा जन्म होताच त्याने आपले प्राण गमावले. सध्या आम्ही एक पालक म्हणून कठीण परिस्थितीतून जात आहोत. आम्ही सगळ्या डॉक्टर्स आणि स्टाफचे आभार मानू इच्छितो, ज्यांनी अनेक प्रयत्न केरून आम्हाला मदत केली. आम्ही सगळेच यावेळी आतून खूप कोलमडून गेलो आहोत. तसेच आता या कठीण परिस्थितीत तुम्ही आमच्या प्रायव्हसीचा आदर कराल अशी आशा आहे. तुमचेच मीरा आणि बी प्राक,” अशी भावूक पोस्ट बी प्राकने शेअर केली आहे.

बी प्राकच्या पोस्टवर त्याच्या चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच काही बॉलिवूड कलाकारांनी त्यांचे सांत्वन देखील केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी बी प्राकने आपली पत्नी दुसऱ्यांदा आई होणार असल्याची माहिती दिली होती. २०१९ मध्ये बी प्राक आणि मीराचे लग्न झाले होते. तसेच २०२० मध्ये मीराने त्यांच्या आपल्या पहिल्या अपत्याला जन्म दिला होता.

- Advertisement -

 


हेही वाचा :जेनिफर विगेंट करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -