Friday, May 14, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन 'द फॅमिली मॅन' वेब सिरीजचा दुसरा भाग लवकरच होणार प्रदर्शित

‘द फॅमिली मॅन’ वेब सिरीजचा दुसरा भाग लवकरच होणार प्रदर्शित

'द फॅमिली मॅन' च्या दुसर्‍या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच प्रेक्षकांची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे

Related Story

- Advertisement -

मनोज बाजपेयी यांची मुख्य भूमिका असणारी बहुचर्चित वेब सिरीज ‘द फॅमिली मॅन’ च्या दुसर्‍या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता लवकरच प्रेक्षकांची प्रतीक्षा पूर्ण होणार आहे. मे महिन्यात अमेझोन प्राइम वर ‘द फॅमिली मॅन’ चा दुसरा भाग रिलीज करण्यात येणार आहे. श्रीकांत तिवारी या व्यक्तिरेखे भोवती या वेब सिरीजची कथा फिरते. जो फिक्क्षनल अनालिसेस आणि देखरेख म्हणजेच टास्क (TASC) मध्ये वरिष्ठ विश्लेषक म्हणून काम करतो. तसेच ही संस्था भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचा (NIA) भाग आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Manoj Bajpayee (@bajpayee.manoj)

- Advertisement -


काही दिवसांपूर्वी सैफ अली खानची मुख्य भूमिका असणारी ‘तांडव’ ही वेब सिरिज वादाच्या भोवर्‍यात अडकली होती. या वादांनातर ‘द फॅमिली मॅन’ च्या दिग्दर्शकांनी तत्काळ योग्य  खबरदारी घेऊन वेब सिरीज मध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला. यातील काही सीन काढून टाकण्यात आले तसेच त्या सीनचे पुन्हा चित्रीकरण करण्यात आले. या कारणामुळे वेब सिरिज रिलीज होण्यास काही वेळ लागला असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी दुसर्‍या भागाचा टीजर प्रसारित करण्यात आला होता. या टीजरला चाहत्यांनी जोरदार पसंती दर्शवली होती.


हे हि वाचा – Viral Video: म्हणून अलाया फर्निचरवालाने भर स्टेजवर आजोबा कबीर बेदींना मारली मिठी

- Advertisement -