प्रियंका चोप्राच्या ‘सिटाडेल’चा दुसरा सीझन जाहीर

बॉलिवूड ते हॉलिवूड असा प्रवास करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा सध्या तिच्या ‘सिटाडेल’या हॉलिवूड वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. प्रियंका चोप्राच्या चाहत्यांनाही ही वेबसीरिज खूप आवडली. अशातच, आता या वेबसीरिजचा दुसरा सीझन देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत निर्मात्यांनी माहिती दिली आहे.

‘सिटाडेल’चा दुसरा सीझन जाहीर

‘सिटाडेल’ वेबसीरिजचा दुसरा सीझन निर्मात्यांनी पोस्टरसह जाहीर केला आहे. Citadel on Prime ने प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूड स्टार रिचर्ड मॅडनचे नवीन पोस्टर आपल्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केले आणि चाहत्यांना दुसऱ्या सीझनबद्दल माहिती दिली. या ग्लोबल वेबसीरिजचे पहिल्या सीझनची निर्मिती जो रुसोने केली होती, तर दुसऱ्या सीझनमध्ये तो स्वत: दिग्दर्शन करणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियंका चोप्रानेही तिच्या इन्स्टा स्टोरीवर ही पोस्ट पुन्हा पोस्ट केली आहे, परंतु निर्मात्यांनी अद्याप ‘सिटाडेल-2’ च्या दुसऱ्या सीझनची रिलीज डेट शेअर केलेली नाही.

प्रियंका चोप्राने साकारली होती ही भूमिका

‘सिटाडेल’च्या पहिल्या सीझनच्या यशानंतर त्याचा दुसरा सीझन जाहीर झाला आहे. पहिल्या सीझनमध्ये ग्लोबल आयकॉन प्रियंका चोप्राने एजंट नादिया सिंगची भूमिका साकारली होती. आता या व्यक्तिरेखेला पुढे नेत प्रियंका चोप्रा पुन्हा नव्या सस्पेन्ससह दिसणार आहे. या वेबसीरीजनंतर आता प्रियंका चोप्रा चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रासोबत कतरिना कैफ आणि आलिया भट्ट देखील दिसणार आहेत.


हेही वाचा :