मराठीमध्ये चित्रपट जसे विविध विषयांवर येत असतात त्याचप्रमाणे मराठी मालिकांमधेही विविध विषय येत आहेत. प्रेक्षक सुद्धा या मालिकांना भरभरून प्रतिसाद देत आहेत. प्रेक्षकांना नवीन काय द्यायचे जेणेकरून त्यांचे मनोरंजन होईल असा प्रश्न नेहमीच मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक, लेखक यांच्या समोर असतो. पण अशातूनच नवीन विषय आणि विचार मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षांसमोर येतात.
हे ही वाचा – मानसी नाईक पती प्रदीप खरेरापासून होणार विभक्त? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण
‘हृदयी प्रीत जागते’ ही मालिका 7 नोव्हेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ह्या मालिकेत अभिनेत्री पूजा कातुर्डे प्रेक्षकांना मुख्य भूमिका साकारताना दिसते आहे. पूजाने या मालिकेत वीणा हे पात्र साकारले आहे. अभिनेत्री पूजा कातुर्डे हिने मालिका, वेब सिरीज आणि नाटक या तिन्ही माध्यमंध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. ही मालिका सुरु होऊन काहीच दिवस झाले असूनही प्रेक्षकांनी मलिकेला उत्तम प्रतिसाद दिला आहे.
हे ही वाचा – ‘ऊंचाई’ चित्रपटाने अवघ्या 2 दिवसात कमावले इतके कोटी
याच मालिकेबद्दल आणि मालिकेतल्या आपल्या प्रवासा बद्दल बोलताना पूजा म्हणाली की, ‘हृदयी प्रीत जागते’ ही मालिका एक संगीतमय प्रेम कथा आहे त्यात वीणा ही अतिशय साधी मुलगी आहे आणि ती तिच्या बाबांची खूब लाडकी आहे. वीणा लहानपणापासून आईच्या प्रेमाला मुकली आहे त्यामुळे बाबाच तिच्यासाठी सर्वस्व आहेत. वीणाचे वडील कीर्तनकार आहेत, तिला कीर्तनाची आवड आहे, कौटुंबिक संबंध मजबूत आणि एकजूट ठेवणे हे तिचे ध्येय आहे. प्रेक्षकांना सुद्धा मालिकेत मांडलेला हा वेगळा विषय आवडला असून प्रेक्षकसुद्धा वीणाला म्हणजेच अभिनेत्री पूजाला आणि मालिकेला उत्तम प्रतिसाद देत आहेत.