मन उडू उडू झालं मालिकेचा शेवटचा सीन शूट, मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

मन उडू उडू झालं ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं बोललं जात आहे. यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांमध्येही नाराजी आहे. नुकताच या मालिकेच्या शेवटच्या सीनचे चित्रीकरण करण्यात आले.

मन उडू उडू झालं ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील दीपू आणि इंद्राची जोडी सुद्धा प्रेक्षकांना भावली. डॅशिंग इंद्रा तर तेवढीच शांत आणि सोज्वळ अशी दीपिका. मालिकेतील या जोडीने सुद्धा प्रेक्षकांच्या मानत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे या मालिकेची लोकप्रियता सुद्धा दिवसेंदिवस वाढत होती. पण अशातच मन उडू उडू झालं ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं बोललं जात आहे. यामुळे मालिकेच्या प्रेक्षकांमध्येही नाराजी आहे. नुकताच या मालिकेच्या शेवटच्या सीनचे चित्रीकरण करण्यात आले.

हे ही वाचा – शरद पवारांकडून शिवानी बावकरचं विशेष कौतुक, पोस्ट शेअर करत शिवानी म्हणाली…

या मालिकेत सध्या इंद्रा आणि दीपू यांच्या लग्नाचा सिक्वेन्स शूट करण्यात येत आहे. सध्या ही मालिका एका रंजक वळणावर आली आहे. या मालिकेतील इंद्रा, दीपू, शलाका, कार्तिक, सानिका या सगळ्याच व्यक्तिरेखांनि प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. मालिकेची कथा आता वेगळ्याच वळणावर आली आहे. सगळे अडथळे पार करून इंद्रा आणि दीपू होणार असं मालिकेच्या सध्याच्या ट्रॅक वरून पाहायला मिळत आहेत.

हे ही वाचा – सेफ झाला शेफ, करिनासाठी बनवले पंचपक्वान्न

 हे ही वाचा – तब्बल तीन महिन्यांनी हर्ष-भारतीने शेअर केला बाळाचा फोटो

मन उडू उडू झालं ह्या मालिकेच्या जागी आता ‘तू चाल पुढं’ ही नवी मालिका प्रसारित होणार आहे. येत्या १५ ऑगस्ट पासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मन उडू उडू झालं ही मालिका रोज संध्याकाळी ७.३० प्रसारित होत होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचा टीआरपी सुद्धा घसरत चालला होता. ‘तू चाल पुढं’ ही मालिका मन उडू उडू झालं या मालिकेची जागा घेणार आहे. दरम्यान ‘तू चाल पुढं’ ही मालिका एका गृहिणीची आहे जिची स्वप्न मोठी आहेत. त्यामुळे या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात ते पाहणं महत्वाचे आहे.

हे ही वाचा – शुक्रवारीच का होतात चित्रपट प्रदर्शित? हिंदी चित्रपटांपासून झाली होती सुरुवात